दिनांक १ जून २०२४ श्रीगोंदा:
श्रीगोंदा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता श्री गणेश भोसले यांना शासनाने उप अभियंता म्हणुन नेमणूक केली.. परंतु, शासकीय नियमानुसार प्रमोशन वरील उपअभियंता यांना झोन सोडून दुसरीकडे नेमणूक देणे आवश्यक असताना, ग्रामविकास विभागाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून भोसलेंना श्रीगोंदा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता म्हणून कसे नेमले..? हा प्रकार दुसऱ्या उपअभियंतावर अन्याय करणारा असून, याची चौकशी होऊन संबंधित उपअभियंताला नाशिक झोन बाहेर बडतीची नेमणूक द्यावी.. याबाबतचे वरिष्ठ कार्यालयासह पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात येणारं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या श्रीगोंदा पंचायत समितीत कार्यरत असणारे शाखा अभियंता श्री गणेश भोसले यांना शासनाने दिनांक ५ मार्च २०२४ ला उपअभियंता पदाचे प्रमोशन दिले असून, ही नियुक्ती देताना भोसलेंना नाशिक झोन बाहेर बढतीवर नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र, शासनाचे व ग्रामविकास विभागाचे सर्व नियम डावलून भोसलेंना श्रीगोंदा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता पदी नेमणूक कशी केली..? असा सवाल वरिष्ठांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
एक वर्षापासून कार्यरत असलेले भोसले यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी विविध कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील जलजीवन पाणीपुरवठ्याच्या संदर्भात करण्यात आलेल्या आहेत. तरीही ग्रामविकास विभाग व सामान्य प्रशासन विभागाने श्री. भोसले यांची नियमबाह्य प्रमोशनची नियमावली डावलून श्रीगोंदा पंचायत समितीत उपअभियंता म्हणून बढती दिली कशी..? हा शासनाचा आदेश दुसऱ्या उपअभियंत्यावर अन्यायकारक असल्याने, भोसले यांच्याकडे पुन्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार कोणत्या नियमात बसून दिला..? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे..
भोसलेंची चुकीच्या पद्धतीने श्रीगोंदा येथे नेमणूक देण्यात आली आहे. ती रद्द करावी.. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठल्याही कामकाजाचा अनुभव नसताना भोसले यांच्याकडे अतिरिक्त कारभार कसा दिला..? हे सर्व संशयास्पद असून, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून, भोसलेंची तात्काळ हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
स्रोत:(मागणीनुसार)
