श्रीगोंद्यातील त्या वरीष्ठ अधिकाऱ्याची वाळू माफियांसोबत गोपनीय बैठक..? शासकिय कार्यालयात विशेषतः सुट्टीच्या दिवशी झाली गुप्त चर्चा..!

दिनांक २ जून २०२४ श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील महत्त्वपूर्ण आणि वरिष्ठ असणाऱ्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने तालुक्यातील विविध भागात अनधिकृत चालू वाळू माफियांसोबत गोपनीय बैठक घेतल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात ऐकण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्याच्या विविध भागात छुप्या आणि अवैध पद्धतीने वाळू, मुरूम आणि माती उत्खनन करुन तस्करी होत असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. सरेआम ही तस्करी चालू ठेवण्यासाठी काही रेती माफियांनी तालुक्यातील वरिष्ठ कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर सुट्टीच्या दिवशी गुप्त बैठक घेतल्यामुळे श्रीगोंदा शहरात याविषयी चर्चा होऊ लागली आहे.

दिनांक २५ मे २०२४ शनिवार रोजी सुट्टीच्या दिवशी नमूद वरिष्ठ कार्यालयाच्या मागील दारातून दोन गाड्या भरून आलेली माणसं या कार्यालयात प्रवेश करतात. नंतर त्या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी येतात. विशेषत: रोजच्या कामकाजात उशिरा किंवा दिरंगाने हजर होणारे अधिकारी, त्या दिवशी सुट्टी असतानाही नमूद लोकं जमल्याबरोबर उपस्थित राहिल्याने, परिसरात हजर असणाऱ्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. या आलेल्या लोकांसोबत त्यांची गोपनीय बैठक झाल्यानंतर पुन्हा एका गाडीतून आलेल्या लोकांसोबत त्या अधिकाऱ्यांनी तशीच बैठक केली.

श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी, म्हसे, राजापूर, या भागातून आलेल्या त्या वाळू व माती माफियांसोबत पहिली बैठक झाली. तर, दुसरी पेडगाव येथून आलेल्या वाळू तस्करांबरोबर त्या अधिकाऱ्याची बैठक झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव, आढळगाव, पेडगाव, अजनुज, दानेवाडी, म्हसे, राजापूर, गव्हाणवाडी या परिसरात राजरोस वाळू तस्करी चालू असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.  श्रीगोंदा तालुक्याची स्थानिक महसूल यंत्रणा या अवैध माती, वाळू, मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांवर कारवाई बाबत उदासीन असून, त्यांच्यासोबत बैठक करण्यास सदरील प्रशासन अग्रेसर असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे.

नवीन अधिकाऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक, राजकीय प्रक्रियेचा विशेष अनुभव नसावा..! मात्र, नमूद तालुका हा अवैध्य व्यवसाय आणि अनधिकृत प्रकरणांसंदर्भात वेळोवेळी कायदेशीर लढ्यासाठी सक्रिय आणि एकवटल्याचे पाहण्यात आलेला आहे. याचे भान स्थानिक आणि नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी ठेवावे. असे संतप्त प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहे. तर, शनिवार रोजी झालेल्या या कार्यालयातील बैठकीच्या अनुषंगाने त्या दिवशीचे CCTV फुटेजची मागणी काही सामाजिक पदाधिकाऱ्यांनी केली असल्याचे स्थानिकांकडून समजले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती).. प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading