दिनांक १२ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा टाकळी कडेवळी रस्ता इ जी मा १४१ दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे चाललेले आहे. येथे एस एस कंट्रक्शन, अहमदनगर यांचा गलथान कारभार चालू असुन, श्रीगोंदा ते टाकळी साडेआठ किलोमीटरचे रस्त्याचे काम एस एस कंट्रक्शन ने २०१८ साली शेवटी शेवटी केले होते.
या रस्त्याची देखभाल दुरुस्ती पाच वर्ष करण्यासाठी त्यांना बंधनकारक होते. चार वर्ष खड्डे बुजवण्याचे काम एस एस कंट्रक्शन ने केलेले आहे. आज दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी काम चालू करून, सात किलोमीटर अंतरामध्ये अतिशय खराब अवस्था झालेली होती. यासाठी खराब ठिकाणी मशीनद्वारे पॅच काढावेत शेवटचे काम चांगले व्हावे म्हणून, ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्यावर काम पाहणारे खंडागळे रावसाहेब यांना फोन करून कळवले होते. काम चालू असताना डांबराच प्रमाण कमी आहे. तसेच, खडी कुठेतरी टाकणे.. खड्डे साफ न करणे.. असा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
त्यामुळे श्रीगोंदा टाकळी कडेवळी रोडचे खड्डे रिपेरिंगचे काम लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे होणे अपेक्षित आहे. श्रीगोंदा तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असुन, त्यातच एस एस कंट्रक्शन ने दुर्लक्ष केल्यामुळे येथील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे प्रवाशांचा जीव जाऊ शकतो.
एस एस कंट्रक्शन यांनी कामाची सुधारणा न केल्यास येत्या काळात संभाजी ब्रिगेड मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी यांना येथील वस्तुस्थिती पत्राद्वारे कळवणार आहे. असे प्रसिद्धी पत्रात कळविले आहे. एस एस कंट्रक्शनला काळया यादीत का टाकु नये..? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
