एक एप्रिल रोजी कोरोना संदर्भात अफवा नको.. तर,एप्रिल फूल ऐवजी देऊ सतर्कतेचा संदेश – शंभुसेना

दिनांक ३१ मार्च,श्रीगोंदा:

शंभुसेना सामाजिक संघटनेने प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोकांना आवाहन करत शिव-शंभु भक्तांनी आफवेचे खोटे संदेश अथवा माहिती चुकीची न देता, पाश्चिमात्य विकृतीचे समर्थन करण्याऐवजी,कोरोना रोगा संदर्भात जनतेने सावध राहत, सतर्कतेचा संदेश देऊन घराबाहेर पडू नका.असे वास्तव खरे संदेश देऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवावे.असे आवाहन शंभुसेना संघटनेचे लक्ष्मीकांत शिर्के यांनी केले आहे.

अवघ्या महाराष्ट्रासह भारत तसेच जगभर कोरोना विषाणूचा जोरदार प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर देशव्यापी कडक लॉकडाऊन लागू झालेला असतानाच,उद्या पाश्चिमात्या विकृतीची शिकवण देणारा एक एप्रिल रोजीचा एप्रिल फूल..म्हणजेच खोट्या अफवांचा प्रसार करण्याचा दिवस असल्याने,त्यातच अशा विदेशी विकृतींचा पगडा आपल्या देशात चांगलाच रूढ़ झाल्याने. आता मात्र संबंधित कोरोना रोगा संदर्भात एक एप्रिल रोजी एप्रिल फूलचे गैरसमजाचे संदेश, अथवा खोटे संदेश,स्वतः च्या नावे किंवा दुसऱ्यांच्या नावे पसरवू नयेत.अशाप्रकारे अप्रिय आणि चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराच पोलिस प्रशासनाने दिला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला म्हणजे,पहिल्या दिवशी नागरिक एप्रिल फुलच्या नावे खोटे संदेश पाठवित असतात.त्यामध्ये संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीला मुर्ख बनविणे तसेच उघड उघड फसविण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर संबंधित व्यक्तिची खिल्ली उडवत मजाकने हसले जाते.मात्र, कोरोनाच्या संदर्भात लोकांना मुर्ख बनविणारा संदेश पाठविल्यास मात्र, पोलीसांतर्फे संबंधित सोशियल मिडियातील मेंबर तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन आणि इतर सदस्यांविरूद्ध ‘कलम १८८’अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने,शंभुसेना संघटनेनेही प्रबोधन करण्याच्या उद्देशाने आवाहन करत शिव-शंभुभक्तांनी आफवेचा संदेश देण्याऐवजी कोरोना रोगा संदर्भात जनतेने सावध राहत, सतर्कतेचा संदेश देऊन,भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवावे.असे आवाहन शंभुसेना संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading