उद्या होणार जलसमाधी आंदोलन, शेतकरी पुत्रानां सामील होण्याचे आवाहन.

दिनांक ७ जून,श्रीगोंदा:

प्रशासनाच्या षंढ कारभारामुळे श्रीगोंदा आजपर्यंत पाण्यापासून वंचित… कर्जत सीमेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळत नाही… तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही: जलसमाधी आंदोलनातील आंदोलक..

शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे यासाठी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रशासनास सादर केले होते. मात्र, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच कुकडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही नमूद आंदोलन संदर्भात प्रतिक्रिया दिल्या नसल्याने नियोजित आंदोलन करण्यासाठी शेतकरी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय झाले असून, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या अस्तित्वासाठी सदर आंदोलन करणार असल्याचे ऋषिकेश गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.

कुकडी पाणी प्रश्न श्रीगोंद्याच्या शेतकऱ्यांसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्या डोळ्यासमोर पाणी विकले जात असल्याने, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन सक्रीय होत पूर्ण करणार असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे. कायद्यात राहून कायदेशीर मार्गाने पाणी मिळवणार, असेही त्यांचे मत आहे.कोरोना प्रादुर्भावा मुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, नमूद आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरी पोलीस प्रशासनाने पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही आमच्या मागणीनुसार गुन्हे दाखल करावेत असेही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना आवाहन केले आहे.

वडाळी गावात १३९ किलोमीटर वरील पुलाच्या खाली जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निश्चित झाल्याचे आंदोलकांनी माध्यमांना सांगितले आहे. या आंदोलनात प्रशासनाच्या षंढ कारभारामुळे श्रीगोंदा आजपर्यंत पाण्यापासून वंचित राहिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

दिनांक ८ जून रोजी दुपारी ३ वाजता कुकडी कॅनोल १३९ किलोमीटरवर वडाळी गावात शेतकरी बचाव कृती समिती श्रीगोंदा चे सर्व पदाधिकारी आंदोलन सुरू करणार असून, कर्जत सीमेपर्यंत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्यासंदर्भात प्रशासनाने नियोजन सादर केल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजू दादा काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना सक्रिय सहभागी होण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले असून, नमूद आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष राजूदादा काकडे, ऋषिकेश गायकवाड, सतीश बोरुडे, निलेश शेलार, सूर्यजित पवार सह बहुतांश पदाधिकारी सामिल होणार असल्याचे समजते आहे.

Leave a Reply