केंद्र सरकार शेतकरी हिताचे: जिल्हाध्यक्ष मुंढे.

दिनांक ७ जून,श्रीगोंदा:

केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असून, गेल्या एक वर्षात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.असे प्रतिपादन भाजप चे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या १ वर्षपूर्ती अभियानाच्या निमित्त्ताने श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बबनराव पाचपुते, भाजप चे संघटक सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगर तालुका भाजप चे माजी अध्यक्ष भालसिंग, बाळासाहेब महाडिक, संतोष लगड, दादा ढवण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मुंढे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने गेल्या एक वर्षात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गोरगरिबांसाठी उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, वयाच्या ६० वर्षानंतर महिना ३ हजार रुपये पेन्शन योजना चालू केल्या. आदी शेतकरी हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत.त्यामुळे हे सरकार लोकधार्जिण सरकार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या केलेल्या कामाची माहिती प्रत तयार करून, बूथ पातळी ते सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सर्व माता, भगिनी, आजी,माजी प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन, प्रधानमंत्र्यांचे पत्र पोहचवण्याचे काम केले आहे.गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न चालू वर्षात सोडण्याचे काम केले. असे शेवटी मुंढे म्हणाले.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते म्हणाले केंद्रातील भाजप सरकारने सध्याच्या कोरोनाच्या महामारीसाठी राज्याला भरीव निधी दिला आहे. तसेच लॉकडाऊन च्या काळातही अन्न धान्य देऊन मदत केली आहे.या संकटातून आपण सावरणारच आहोत व प्रत्त्येक जण आत्मनिर्भर बनणार आहे. या सरकारचे सर्वच निर्णय शेतकरी हिताचे आहेत. आता शेतीमालाला हमी भाव मिळू लागला आहे.त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.विजेच्या प्रश्नही केंद्र सरकारने सोडवला आहे.मागील राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प आणून शेतकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात गावे विजेबाबत स्वयंभू बनली आहेत. असे पाचपुते म्हणाले. पावसाळा चालू होण्यास सुरुवात झाली असताना देखील तूर, हरभरा यांची दलाला मार्फत खरेदी चालू आहे. पण एकीकडे केंद्र सरकार प्रश्न सोडवत असताना, राज्य सरकार अडचणी निर्माण करत आहे.

यावेळी प्रस्ताविक तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले. तर, आभार शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रायकर यांनी केले.यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुवासिनी गांधी ,कार्याध्यक्षा सौ. अनुजा गायकवाड, दत्तात्रय हिरणावले, राजेंद्र उकांडे, सतिष शेठ पोखरणा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading