श्रीगोंदयातील ‘जनता कर्फ्यु’ ११ मे पासून शिथील..

दिनांक १० मे,श्रीगोंदा:

तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या उद्देशाने जनतेने स्वयंम स्फूर्तीने ०५/०५/२०२१ ते १४/०५/२०२१ पर्यंत स्वीकारलेला ‘जनता कर्फ्यु’ उद्या दिनांक ११ मे पासून शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. काही सामाजिक संघटनांनी ‘पवित्र रमजान ईद’ या सणासाठी दोन दिवस जनता कर्फ्यु कमी करण्याची मागणी केली होती. ‘Janata Curfew‘ in Shrigonda relaxed from May 11.

https://bit.ly/bspmycityshrigonda

प्रशासनाने मागे निर्धारित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून हॉस्पिटल, मेडिकल, पेट्रोल व डिझेल पंप (फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच), दूध संकलन, पिण्याचे पाणी या सेवांबरोबर फक्त किराणा दुकानं सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरम्यान इतर सर्व आस्थापने पूर्णपणे बंद राहतील हेही प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे. कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. या ‘जनता कर्फ्यु’ दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे.

स्रोत:(तहसीलदार तथा इनसिडेंट कमांडर,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading