चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाकडून श्रीगोंदयातील या कोविड सेंटरला लाखाची मदत..

दिनांक ११ मे (लोणी व्यंकनाथ,श्रीगोंदा):

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात लोक सहभागातून उभारलेल्या श्री. व्यंकनाथ कोविड सेंटरला चेन्नई सुपर किंग्ज या क्रिकेट टीमचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने १ लाखाची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर किर्लोस्कर कंपनीची टीम भेट देणार असल्याचेही माहिती लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी माध्यमांना दिली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

बाळासाहेब नाहाटा यांच्या पुढाकार व प्रयत्नातून लोणी व्यंकनाथ गावात सुरु केलेले कोविड सेंटरमुळे तालुक्यात रुग्णांच्या उपचाराची सोय झाली आहे. Chennai Super Kings batsman donates Rs 1 lakh to Kovid Center in Shrigonda.

मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाडने पुण्यातील मित्राच्या मार्फत मितेश नाहाटा यांच्याशी संपर्क करीत श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी त्याने एक लाखाची मदत जाहीर केली आहे.

इतर अन्य खेळाडुंकडून मदत मिळवून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड पुढाकार घेणार असल्याचे समजते आहे. तसेच, लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटरला किर्लोस्कर कंपनीची टीमही भेट देऊन पाहणी करत मदत करणार असल्याची माहिती मिळत आहे.

स्रोत:(ऑनलाईन न्यूज)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading