दिनांक ११ मे(सांगवी दुमाला,श्रीगोंदा):
तालुक्यातील सांगवी दुमाला या गावातील जेष्ठ नागरिकांना अजुनही कोविड प्रतिबंधक लस मिळाली नसून, याबाबत आरोग्य विभाग डोळेझाक करत आहे. सांगवी हे तालुक्यातील एका कोपऱ्यात घोड, भिमानदी काठी वसलेले एक छोटेसे गाव असल्यांने या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे.
गावात कोविड पाँजिटीव्ह संख्या वाढत असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काष्टी आरोग्य केंद्राला संलग्न असलेले हे गाव ७ कि.मी. अंतरावर असल्याने, येथील नागरिकांना काष्टी येथे लस घेण्यासाठी जावे लागते. काष्टी गावाची लोकसंख्या जास्त आहे. या गावालाच लस पुरेशी नसल्याने, सांगवी गावातील नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. Sangvi Dumala village in Shrigonda is deprived of vaccine.. Villagers’ condition due to lack of resources.. Demand for vaccination camp in the village instead of Kashti..

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या हि बाब लक्षात आणून दिली असता, त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे मत नलगे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या कारभारावर शंका व्यक्त होत आहे. गावातील थोड्याकाही जेष्ठ नागरिकांनी काष्टी येथे मोठ्या कसरतीने पहिला डोस घेतला असुन, दुसऱ्या डोसचा कालावधी होऊन गेलेला असतांना तो डोस मिळविण्यासाठी नागरिकांना त्रेधातिरपीट उडाली आहे. आम्हांला डोस मिळेल का? या संभ्रमात ते सर्व आहेत. यामुळे गावाला स्वतंत्र लस मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य दिगांबर ज्ञानदेव नलगे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांना निवेदन सादर केले आहे. काष्टी केंद्रावर जाऊन लसीकरनासाठी गर्दी करणे, प्रादुर्भावास कारण ठरत आहे. त्याच बरोबर सांगवी गावांतून काष्टी येथे जाण्यासाठी सर्वांकडेच संसाधन उपलब्ध नाहीत, शिवाय सरकारी बस ही बंद आहेत. अश्यात जेष्ठांसह सर्व सांगवी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने, आरोग्य विभागाने या गावाला आपत्तीत रामभरोसे सोडू नये. असे निवेदनात म्हटले आहे.
स्रोत:(निवेदन)
