“फ्रीडम पॉवर पत्रकार संघाच्या” जिल्हाध्यक्षपदी पत्रकार योगेश चंदन यांची निवड.

दिनांक ९ मार्च (कोळगाव,श्रीगोंदा) :

फ्रीडम पॉवर पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पत्रकार योगेश पोपटराव चंदन यांची निवड केल्याची माहिती,पत्रकार संघाचे सेक्रेटरी ad. संतोष गायकवाड यांनी देत फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक मेढे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या फ्रीडम पॉवर पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश पोपट चंदन यांची निवड झाल्याचे पत्र शनिवार दि.७ मार्च रोजी पत्रकार संघाचे सेक्रेटरी एड संतोष गायकवाड व फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ad.दिपक मेढे यांच्या हस्ते अहमदनगर येथील मुख्य कार्यालयात दिले यावेळी फ्रीडम पॉवर च्या संचालिका संध्या मेढे, राष्ट्रीय खजिनदार सामाजिक कार्यकर्ते युनुसभाई तांबटकर, मार्गदर्शक सैमुअल वाघमारे, फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अतुल लहारे, तालुका अध्यक्ष राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

योगेश चंदन हे ४ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आत्ता पर्यंत दै. पुण्यनगरी, दै.लोकमंथन, दै.लोकवेध, दै.प्रभात, एन.टी.व्ही. न्यूज मराठी या सारख्या वेगवेगळ्या वृत्तपत्रात तसेच न्यूज चॅनल ला काम पाहिले आहे.

चंदन यांची नियुक्ती होताच माजी मंत्री अा. बबनराव पाचपुते, मा.आ.राहुल जगताप, साखर संचालक राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार,महिला/बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा नागवडे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, डॉ.अशोकराव सोनवणे, श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष संदीप कावरे,बहुजन समता पत्र चे संपादक चंदन घोडके, फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश शिंदे,कास्ट्राईप महासंघाचे अध्यक्ष नागनाथ पवळे, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेश इंगळे, यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply