दिनांक ६ जुन २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्याने व श्रीगोंदा तालुक्यातून लंके यांना मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. निलेश लंके यांच्या विजया नंतर कोळगाव मध्ये लंके समर्थकांनी मोठा जल्लोष केला. वाजत गाजत, एकमेकांना मिठाई वाटत लंके यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा विजय साजरा केला.
अहमदनगर दक्षिण मतदार संघातील विजयाचे पारडे कधी विखे यांच्या बाजूने तर कधी लंके यांच्या बाजूने झुकत असल्याने समर्थकांमध्ये चलबिचल होत होती. परंतु, शेवटच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये निलेश लंके यांनी निर्णय आघाडी घेतल्याने कोळगाव येथील लंके समर्थकांनी फटाके व गुलाल उधळून विजय साजरा करण्यास सुरुवात केली.

यामध्ये सोसायटीचे विद्यमान चेअरमन हेमंत नलगे, मार्केट कमिटीचे संचालक नितीन डुबल, कुकडीचे माजी व्हाईस चेअरमन विश्वास थोरात, संचालक मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, संकेत नलगे, शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण खेतमाळीस, माजी उपसरपंच नितीन मोहारे, शरद लगड, युवा नेते ओंकार नलगे, शिवराज देशमुख, सागर नलगे, रघुनाथ लगड, विजय नलगे, निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, महेश जगताप राजूचाचा लगड, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश डुबल, असीर शेख, अजय नलगे, रमेश सुरोगोणी, कोळगाव सोसायटीचे सर्व संचालक तसेच लंके यांचे बहुसंख्य कार्यकर्ते यांनी लंके यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
कोळगाव परिसरामध्ये निलेश लंके यांच्या बाजूने सर्वसामान्य मतदार, शेतकरी व नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान केले. मतदारांनी फोडाफोडीचे राजकारण, कांद्याचे घसरलेले दर यावर आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे निलेश लंके यांना कोळगाव परिसरातून चांगले मतदान झाले. श्री.हेमंत नलगे, चेअरमन, कोळगाव सोसायटी..

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)
