खोमणेंच्या मिरचीचा अमेरिकेतील पिझ्झाला तडका..

घारगाव हे ऊसाचे आगार समजले जात पण गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाई मुळे तरूण मोठ्याप्रमाणावर फळबागा भाजीपाला पिकांकडे वळाले आहेत. अशा परिस्थितीत शरद सोपान खोमणे यांनी शेतीत जिलोपिनो मिरचीची लागवड केली या मिरचीचा तडका अमेरिकेतील पिझ्झा बर्गरला बसला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील मिरचीने अमेरिकेतील पिझ्झाची रुची वाढली आहे.

सोपानराव खोमणे यांना वडिलोपार्जित १५ एकर शेती शरद अरूण ही दोन मुल सोपानराव हे नागवडे साखर कारखान्याचे संचालक त्यामुळे शरद व अरूण यांनी शेतीची सुत्रे हातात घेतली आणि शेतीतील पिकांचा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला शेतात बहुपिक पध्दतीचा अवलंब सुरू केला.

शरद यांना यांची पत्नी साधना व बंधू अरुण यांच्या पत्नी अनुजा यांची विशेष साथ यामुळे खोमणेंच्या शेतीवाडीत वेगळा रंग भरण्यास सुरूवात झाली. फिल्ड फ्रेश ॲग्री कंपनीचे अमोल लगड व प्रमोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिलोपिनो या मिरचीची लागवड तंत्र मिळविले. ही मिरची अमेरिकेत एक्स्पोर्ट होण्यासाठी कंपनीने दिलेल्या रेषो नुसार जैविक रासायनिक खते औषधे यांचा वापर केला. त्यामुळे खोमणेची जिलोपिनो मिरची अमेरिकेत एक्स्पोर्ट झाली आणी दर वर्षी ही मिरची लागवड करण्याची गोडी खोमणे कुंटूबाला लागली आहे. या मिरचीतून पाच महिन्यात उत्पादन खर्च वजा जाता सुमारे साडे तीन लाखाचा निव्वळ नफा मिळतो त्यामुळे खोमणे परिवाराच्या प्रपंचात जिलोपिनो मिरचीने लाली आणली आहे. सध्या खोमणे यांच्या शेतात सहा एकर ऊस व दोन एकर डाळिब व इतर पिके आहेत.

खोमणे परिवाराने बहुपिक पध्दतीचा अवलंब केला. त्यामुळे नफ्याचे गणित जुळले आहे. असून परिसरातील मजुरांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. सध्या पिकाचे मार्केटिंग करणे मोठी समस्या आहे. काही व्यापारी शेतीमाल शेतकऱ्यांची फसवणूक करतात. हे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. पण फिड फ्रेश कंपनीचे अधिकारी लागवडीपापासून पिकाची विक्री करण्यापर्यंत हमी देत आहेत. बाजार पेठेतील भावात चढ उतार झाला तरी फिड फ्रेश कंपनी करारानुसार शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव देते ही शेतकऱ्यांच्या जमेची बाजू आहे.

संदेश

आम्ही उस उत्पादक शेतकरी होतो. अलिकडे उस जळण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी केले आणि पिक घेण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार पाणी आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन बदलले पाहिजे तरच शेतीतून चार पैसे नफा मिळेल.शरद खोमणे.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading