अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत..

दिनांक ६ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा ताई राजेंद्र नागवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी वांगदरी येथे होणार आहे. दुपारी १२:०० वाजता अंबिका माता मंदिर प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमास शिवसेना नेते व खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, काष्टीचे सरपंच आणि शिवसेना उपनेते साजन पाचपुते, तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली.

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या अनुराधा नागवडे यांना मतदार संघातील जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. मतदार संघात आणि राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, निवडणुकीत नागवडे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा आत्मविश्वास साजन पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी ही एकजुटीची संधी असून, बाबासाहेब भोस, साजन पाचपुते, व प्रशांत दरेकर यांनी सर्व शिवसैनिक, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

प्रचार शुभारंभाची तारीख व वेळ: गुरुवार, ७ नोव्हेंबर, दुपारी १२:००  वाजता.

ठिकाण: अंबिका माता मंदिर प्रांगण, वांगदरी. ता. श्रीगोंदा.

प्रमुख पाहुणे: शिवसेना नेते खासदार संजय राऊत.

उमेदवार: सौ. अनुराधा ताई राजेंद्र नागवडे.

तर्फे: महाविकास आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या विजयी प्रचाराला यशस्वीतेची साथ द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

स्रोत:( प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply