सर्व्हेत नापसंत असलेल्या विक्रम पाचपुते यांची उमेदवारी नेमकी कोणासाठी फायद्याची..?

दिनांक १० नोव्हेंबर २०२४ श्रीगोंदा:

मतदारसंघाचा सर्व्हे करूनच आपला उमेदवार ठरविण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्णय श्रीगोंद्यात मात्र फसला. अवघ्या ९% मतदारांनी पसंती दिलेल्या विक्रम पाचपुते यांचे नाव कापून भाजपने बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिलेली. पण उमेदवारीसाठी अट्टहास करून बसलेल्या विक्रम यांनी अर्ज भरताना आई बरोबर आपलाही डमी अर्ज दाखल केलेला. नंतर आईला पुढे घालत पक्ष नेतृत्वाला कोंडीत पकडत आईची माघार घेत स्वतःची उमेदवारी कायम ठेवली.

विक्रम पाचपुते उमेदवार झाले असले तरी पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. शिस्तीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या भाजपमध्ये विक्रम यांचे उलटे डाव बेशिस्तीचे कारण ठरले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात कळीचा मुद्दा ठरलेली श्रीगोंद्याची जागा आता चौरंगी लढतीमुळे चर्चेत आहे. भाजपने उमेदवार ठरवताना केलेल्या सर्व्हे मध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेल्या अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्या नावाचीही चाचपनी केली होती. यात विक्रम पाचपुते यांना जगताप व नागवडे यांच्या पेक्षा फारच कमी पसंती मिळाल्याने पक्षाने प्रतिभा पाचपुते यांच्या नावासाठी रिसर्व्हे केला.

विक्रम यांच्या तुलनेने प्रतिभा पाचपुते यांच्या नावाला मतदारांनी थोड्या जास्त प्रमाणात पसंती दाखवल्याने भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली. पण विक्रम पाचपुते यांनी आईचा उमेदवारी अर्ज माघारी घेत स्वतःच्या पदरात उमेदवारी पाडून घेतली आहे. सर्व्हेत प्रचंड मागे असलेल्या विक्रम यांनी केलेली उमेदवारी भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे असल्याने भाजपने विक्रम यांना रसद पुरवण्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारीमुळे अनुराधा नागवडे व राहुल जगताप या दोन्ही उमेदवारांना निवडणूक सोपी झाली असली तरी अंतिमतः त्यांच्या उमेदवारीने नेमके कोणाचे पारडे जड झाले आहे..? हे मात्र निवडणूक निकालातच कळणार आहे.

स्रोत:(अधीकृत माहितीनूसार)

जाहिरात…

Leave a Reply