दिनांक ९ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. या मतदारसंघातील अनेक राजकीय नेते आपले पक्ष सोडून नवीन गठबंधन करत आहेत. काही नेत्यांनी आपले विचार अनुरूप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी नेते राजेंद्र आबा मस्के यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाला आपला ठाम पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. “आमचे विचार आणि उद्दिष्टे एकसमान असल्याने राहुल जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे म्हस्के यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक लढतीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांमध्ये राहुल जगताप, राजेंद्र आबा मस्के, स्नित्तल भैय्या वाबळे, हरिदास शिर्के, मनोहर दादा पोटे, प्रमोद म्हस्के, अॅड. पुरुषोत्तम फाटे, अख्तर भाई शेख, टिळक भोस, संभाजी देवीकर, गौतम घोडके, विशाल घोडके, संदीप उमाप, आणि शिवाजी घोडके यांचा समावेश होता. पत्रकार परिषदेमध्ये या नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करताना, ग्रामीण विकास, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
राजेंद्र आबा म्हस्के यांनी पाचपुते यांच्या कार्यशैलीवर टीका करताना म्हटले की, “सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. हक्काच्या पाण्यासाठी आम्ही शासन स्तरावर याचिका दाखल केली, परंतु प्रत्यक्षात काहीच फायदा झालेला नाही.” त्यांच्या मते, राहुल जगताप संघर्षशील नेता असून त्यांच्या सोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही ही लढाई आंदोलन म्हणून लढणार आहोत. प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, “माझ्यावर टीका करणाऱ्यांनी प्रथम आपले घर पाहावे. आमच्या मनात शरद पवार यांचा आदर असल्यामुळे ते आमच्या बॅनरवर राहतील.” बाबासाहेब भोस यांच्याबाबत बोलताना जगताप यांनी आदर दर्शवला मात्र, त्यांनी आरोपांची पातळी सांभाळावी, असे आवाहन केले.
स्रोत:(पत्रकार परिषद)




