श्रीगोंदा, दि. ३० ऑगस्ट २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे दोन आरोपींनी मागील काही महिन्यांपासून मजुरांना बळजबरीने काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या मजुरांना शेतात, गोठ्यात, मेंढपाळीच्या कामासाठी डांबून ठेवून त्यांच्याकडून गुलामांसारखे काम करून घेतले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम १४३(१)(ए)(बी)(सी), १४३(२), १४३(३), १४०(४), १४२, १४६, ३५१(२), ११५(२), १२७(२) तसेच बंध बिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ चे कलम १६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 आरोपींची माहिती
- शिवाजी दादा कोकरे, वय ३२ वर्षे
- संपत आप्पा कोळपे, वय ३३ वर्षे
(दोघेही रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)
🔹 पीडित व्यक्ती
- भैय्या (पूर्ण नाव व गाव माहिती नाही), वय अंदाजे 30 वर्षे
- राजू यादव, वय अंदाजे 20 वर्षे (गाव माहिती नाही)
- नाव गाव माहिती नाही, पुरुष, वय अंदाजे 55-60 वर्षे

३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास लोणी व्यंकनाथ येथे आरोपींच्या घरातून पीडितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात उघड झाले की, आरोपींनी मागील १ ते २ महिन्यांपासून मजुरांना धमकावून, शिवीगाळ करून व जेवण न देता बळजबरीने काम करून घेतले.
पोलिसांना ही माहिती दुपारी १२ वाजता मिळाली आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

- फिर्यादी: पोलीस कॉन्स्टेबल अमोल श्रीरंग आजबे (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर)
- दाखल अंमलदार: पोहेकाँ. पी. टी. भांडवलकर
- प्रभारी अधिकारी: पो.नि. किरण शिंदे
- तपास अधिकारी: पो.उप.निरीक्षक संजय वाघमारे

श्रीगोंदा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे या मजुरांची सुटका होऊन गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उपनिरीक्षक संजय वाघमारे करत असून पुढील तपासात आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही माहिती घेतली जात आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस)
