सिद्धार्थनगर मध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण संपन्न..

दिनांक १२ सप्टेंबर, श्रीगोंदा:

कोरोना साथ प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम देशभर सुरू झाली असून, या लसीकरणाचा लाभ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. काल दिनांक ११ सप्टेंबर रोजी सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात घेण्यात आलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये बहुतांश लोकांनी सहभाग घेतला.

नगरसेविका सोनालीताई हृदय घोडके यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने व सक्रिय कार्यकर्त्यांच्या मदतीने हा कॅम्प यशस्वीरित्या पार करण्यात आला. साधारण ४०० लोकांचे येथे लसीकरण करण्यात आले आहे.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर, डॉक्टर अनिल घोडके, डॉक्टर राजोळे, आरोग्य सेविका चितळकर ताई, थोरात ताई, नगरसेविका सौ. सोनाली ताई हृदय घोडके, नगरसेवक निसार भाई बेपारी, हृदय दादा घोडके, गणेशभाऊ घोडके, सौ.मनीषा चंदन घोडके, सौ.रेश्मा अमर घोडके, दत्ता जगताप, दीपक घोडके, नंदू भाऊ ससाणे, अमर घोडके, अविनाश भाऊ घोडके, विशाल भाऊ घोडके, श्रीकांत दादा घोडके, पप्पू घोडके, भाऊसाहेब घोडके, लक्ष्मण घोडके, शिवाजी आप्पा घोडके, संपत घोडके, पत्रकार नितीन रोही, पत्रकार अंकुश तुपे, कुणाल शिरवाळेसह सिद्धार्थ नगर, ससाणेनगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रोत:(दिनांक ११ सप्टेंबर रोजी आयोजित लसीकरण कॅम्प)

कार्यक्रमातील छायाचित्रे

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading