दिनांक १७ जून (भिंगाण,श्रीगोंदा):
भिंगाण खालसा/दुमाला गावामध्ये साधारण वीस ते बावीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काही रुग्ण जास्त गंभीर आहेत. आदिवासी बांधवांची या गावामध्ये लक्षणीय लोकसंख्या असून, मूलभूत वैद्यकीय सेवांपासून स्थानिक दूर असल्याने, या गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. लसीकरणापासून दुर्लक्षित असलेल्या या गावांत लवकरात लवकर लसीकरण कॅम्प व्हावा, अशी स्थानिकांची मागणी जोर धरत आहे. अन्यथा येथे वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या संभाव्य तिसऱ्या लाटेत भिंगाण गावाची परिस्थिती हाताबाहेर नेण्यास वेळ लावणार नाही.

एकीकडे प्रशासन रुग्ण संख्या कमी झाली असे दाखवीत असेल परंतु, तसे काही या गावात झालेले नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे गाव आढळगाव जिल्हा परिषद गटामध्ये येत असल्याने, आढळगावात ही या रुग्णांची कुठलीच नोंद नाही. तर, श्रीगोंदा शहर जवळ असल्याने सर्व टेस्ट या ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे झालेल्या आहेत. administration- neglects- bhingan-village- villagers- demand- vaccination-camp-i n- the- village
त्यामुळे उपचारासाठी दुर्लक्षित व संभ्रमात सापडलेल्या भिंगाण गावाकडे आढळगाव ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच, नमूद गावात तात्काळ लसीकरणाचा कॅम्प घेत रुग्णांच्या टेस्ट होणे गरजेचे आहे. यामध्ये श्रीगोंद्याचे (तहसीलदार) प्रदीप पवार सर, तालुका (आरोग्य अधिकारी) डॉ.नितीन खामकर सर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांनी या उपेक्षित ग्रामस्थांकडे लक्ष द्यावे. अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर तरुण एकत्र येऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड)
