#श्रीगोंदा..ॲट्रॉसिटीचा धाक दाखवत पैसे व जागा बळकावण्याचा प्रकार.?

दिनांक १८ जून, श्रीगोंदा:

शहरालगत श्रीगोंदा जामखेड राज्यमार्गा नजीक असलेल्या एका शिक्षकाच्या शेतात मागील काही वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील एका इसमाने ती जागा बळकवण्याच्या उद्देशाने ॲट्रॉसिटी ॲक्टचा धाक दाखवून काही रुपये व दोन गुंठे क्षेत्र हस्तगत केल्याचे निदर्शनास आले आहे.

श्रीगोंदा जामखेड रोड लगत हा इसम त्या शिक्षकाच्या जागेमध्ये काही वर्षांपासून कुटुंबासह वास्तव्यास होता. १० – १५ दिवसांपूर्वी जागा मालक जागा व घर खाली करण्यास गेला असता, त्यावर अश्लील, जातीवाचक शिवीगाळ व राहते जागेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न अशी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी या मागासवर्गीय इसमाने केली होती. मात्र, या मागणीनंतर नमूद जागा मालक व तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय इसमामध्ये छुपा व्यवहार होत, नमूद प्रकरण दडपले असल्याचे समजते आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सविस्तर माहिती अशी की, याठिकाणी तात्पुरता वास्तव्यास असलेल्या या इसमाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या शिक्षकाच्या मुलाने सदर इसमास बाहेर काढण्यासाठी वादावादी केली. परंतु, नमूद इसमाने बेबनाव करत, स्थानिक प्रशासनाकडे काही कार्यकर्ते घेऊन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली. प्रशासनाने चौकशी करून, गुन्हा दाखल करु असे सांगितले. दरम्यान कालखंडात त्या व्यक्तीने मध्यस्थीच्या माध्यमांतून तडजोड करण्यास सुरुवात केली आणि अखेर दोन गुंठे क्षेत्र आणि रक्कम देत नमूद शिक्षकाच्या मुलांनी तो विषय मिटवला.

पोलीस स्टेशनचा धाक दाखवत कार्यक्षेत्रात अनेक प्रकार घडतांना यापूर्वीही निदर्शनास आलेले आहेत. सदर प्रकरण सुद्धा काही नवीन नाही. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पैसे उकळणे, जमिनी लाटणे हे प्रकार सर्रास चालू आहेत. पण, ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर आणि मागासवर्गीयांसाठी संरक्षण कवच असणाऱ्या कायद्याचा गैरवापर करणे.! ही बाब चुकीची असल्याचे समोर येत आहे. सदरील प्रकरण न्यायपालिकेत प्रलंबित असतांना, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून, नमूद मागासवर्गीय इसमाने स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

जर, जागा मालकाने त्याच्या जागेत असलेल्या या व्यक्तीवर अन्याय केला होता. तर, त्याने न्यायीक मार्गाने सदरील प्रकरण हाताळणे गरजेचे होते. मात्र, कायद्याचा गैरवापर करून, त्याने दोन समाजात तेढ व कायद्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, नमूद प्रकरणांमुळे ॲट्रॉसिटी कायद्याबाबत इतर समाजाचा दृष्टीकोनही बदलत चालला आहे. shrigonda- a- form- of- grabbing- money- and- space- out- of- fear- of- atrocities

खरंतर गंभीर प्रकरणांत अत्याचार झालेल्या पीडितांना पोलीस ठाण्यापर्यंत येऊ दिले जात नाही. किंवा, पीडित काही तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल करण्यास येत नाहीत. परंतु, अशा चुकीच्या पध्दतीने कायद्याचा गैरवापर करू पाहणाऱ्या लोकांमुळे कायद्यासह चळवळीतील कार्यकर्त्यांची पायमल्ली होताना दिसत आहे.

स्रोत:(तक्रारी अर्ज,कार्यकर्त्यांशी व स्थानिक प्रशासनाशी वार्तालाप)

(प्रतीकात्मक फोटोचा वापर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading