ग्रामस्थांच्या मागणीनंतर आरोग्य यंत्रनेकडून सकारात्मक प्रतिसाद, भिंगाण गावामध्ये कोरोना टेस्ट कॅम्प संपन्न..

दिनांक १८जून (भिंगाण,श्रीगोंदा):

भिंगाण ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने श्रीगोंद्यातील स्थानिक आरोग्य यंत्रणेने दखल घेत, कोना लसीकरनाबाबत निर्णय घेत, आज अँटिजेन टेस्टचा कॅम्प घेतला आहे. याबाबत नानासाहेब शिंदे यांनी माहिती दिली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

नाना शिंदेंनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर स्थानिक आरोग्य यंत्रनेणे तात्काळ दखल घेतली असून, आज भिंगाण गावामध्ये कोरोना टेस्टचा कॅम्प घेण्यात आला. तर, उद्या लसीकरण कॅम्प घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आज रोजी ४९ व्यक्तींच्या टेस्ट झाल्या. त्यातील ३ पॉझिटिव्ह आल्या असून, १५ व्यक्तिंच्या घशातील नमुने नगरला पाठवण्यात आले आहेत. हा कॅम्प डॉ.आनंदकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. तसेच, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर सर यांनी याठिकाणी भेट दिली. Corona test camp in Bhingana village today

चोराचीवाडी ग्रामपंचायतीचे (सरपंच) परसराम लांडगे, ग्रामपंचायत (सदस्य) अजिनाथ आमटे, (सदस्य) सौ. अनिता घोलवड, (संभाजी ब्रिगेडचे) नाना शिंदे सह गावातील ग्रामस्थ पहिल्या दिवशी सुज्ञ तरुणांनी एकत्र येऊन गाव फवारणी केले होते. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अँटीजेन टेस्ट केल्या. तसेच, उद्या ५५ वर्षे वयाच्या पुढील ग्रामस्थांचे लसीकरण होणार आहे. यामुळे गावातील रुग्ण संख्या कमी होण्यासाठी मदत होईल असे शिंदे यांनी सांगितले आहे.

स्रोत:(नाना शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading