महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून ९ गावांमध्ये गरजू कुटुंबाना किराणा वाटप..भेदभाव न करता या संकटात गरजू कुटुंबापर्यंत किराणा पोहचला याचे समाधान वाटतं – सुनिल पाटील.

दिनांक १९ जून, श्रीगोंदा:

तालुक्यातील गरीब कुटुंबाना “कोरो इंडिया, मुंबई“, महिला मंडळ फेडरेशन, ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या प्रयत्नातुन श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, टाकळी लोणार, घारगाव, बेलवंडी बु., लोणी व्यंकनाथ, पारगाव सूद्रीक, शेडगाव, टाकळी या गावातील गरजू कुटुंबांना महिनाभराचे किराणा व धान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी लोणी ‌‌व्यंकनाथ ‌व पारगाव सु. येथील ग्रामपंचायतीने संस्थेला आभार पत्र दिले व संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांचा आदर सत्कार केला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

ग्रामीण विकास केंद्र संस्था १९९५ पासून भटके-विमुक्त आदिवासी, वंचीत, शोषित, दुर्लक्षित घटकांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनामुळे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघता कोरो इंडिया, मुंबई आणि महिला मंडळ फेडरेशन, ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या सहकार्याने सदर किराणा वाटप करण्यात आला.

किराणा वाटप करण्यासाठी गावकऱ्यांनी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. सुनिल पाटील लोणी व्यंकनाथ चे माजी उपसरपंच बोलताना म्हणाले की, “ग्रामीण ‌विकास केंद्र” या संस्थेने किराणा वाटत असतांना जात पात न पाहता गावातील अत्यंत गरजू कुटुंब शोधले आहेत. गावातील मा.श्री.बाळासाहेब नाहाटा, कृ.उ.बा.स.मुंबई, अभिषेक लडकत, (सरपंच) रामदास ठोंबरे, (मा.उपसरपंच) संतोष माने, (सदस्य) राहूल गोरखे तर, पारगाव सु.मध्ये (सरपंच) मा. बबनराव बोडखे, (ग्रामविकास अधिकारी) गोळे भाऊसाहेब, (सदस्य) मंगेश घोडके, राहूल कोठारे,आढळगावात (जिपचे मा. सदस्य) अनिल ठवाळ किराणा वाटप करताना उपस्थित होते. Distribution of groceries to needy families in 9 villages through Women Empowerment Program. I feel satisfied that the groceries reached the needy families without any discrimination – Sunil Patil.

ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ बोलतांना म्हणाले की, हि कोरोनाची वाईट परिस्थिती पाहून संस्था अठरा लाख रुपयाचा किराणा श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या तीन तालुक्यात वाटत आहे. “संस्थेचे (संस्थापक) अँड.डॉ अरुण जाधव, (संचालक) बापू ओहोळ, महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे (समन्वयक) सागर भांगरे, ग्रामीण विकास केंद्राचे (प्रकल्प समनव्यक) सचिन भिंगारदीवे, दिपक माळी, संतोष भोसले, छाया भोसले, सुनीता बनकर, पल्लवी शेलार, उज्वला मदने, मनीषा काळे, जालिंदर शिंदे आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने परीश्रम घेतले. अशी माहिती लोकअधिकार आंदोलनाचे (जिल्हा समन्वयक) संतोष भोसले यांनी माध्यमांना दिली.

स्रोत:(संतोष भोसले)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading