होते. डाव्या बाजुला ज्या मॅडम बसलेल्या होत्या त्यांच्या हातात वही व पेन होती आणि मी आत आल्यापासून त्या माझं निरीक्षण करत होत्या. मला नंतर लक्षात आलं, त्या बहुधा मानसशास्त्रज्ञ असाव्यात. उरलेले तीन जण गोलाकार पध्दतीने बसले होते आणि माझा बायोडेटा वाचत होते. माझ्या मुलाखतीची भाषा मी इंग्रजी निवडली होती.. मी टेबलजवळ गेलो आणि सर्वप्रथम तिथे बसलेल्या महिला सदस्यांना, नंतर चेअरमन सरांना व शेवटी उर्वरित सर्व सदस्यांना मी अभिवादन केलं.

(यापुढील संपूर्ण संभाषणाचा मी अनुवाद करून सांगणार आहे.) चेअरमन सर: आओ राजेंद्र, गुड मॉर्निंग. बैठो। (ते हिंदीत बोलले) मी: थंॅॅक यूव्हेरी मच सर ! चेअरमन सर: तर तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही एमबीबीएस २०११ ला पूर्ण केलंय? मी: नाही सर, २०१२ ला. चेअरमन सर: तर मग, आता तुम्ही काय करत आहात? एखादी नोकरी? मी: नाही सर. खरं तर मी अगदी मागच्याच महिन्यात माझी इंटर्नशिप पूर्ण केली आहे. आणि त्यानंतर मी या मुलाखतीची तयारी करत होतो. (माझ्या या उत्तराने व माझ्या वयाकडे पाहून मी पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र झाल्याचं पाहून चेअरमन सर प्रभावित झाल्यासारखे वाटले. आणि त्यावरून माझ्या पुढील मुलाखतीची दिशा ठरली असावी, असं मला वाटतं.) चेअरमन सर (आपल्या खूर्चीत ताठ बसत आणि समोर वाकून माझ्या अधिक जवळ येत): तुम्ही इतक्या लहान वयात सिव्हिल सर्विसेस जॉईन करण्यासाठी एवढे उत्सुक का आहात? मी: सर, खरं तर मी सिव्हिल सर्विसेस जॉईन करण्याची तयारी माझ्या इंटर्नशिपच्या दरम्यानच सुरू केली. आणि मला मनापासून असं वाटतं की स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करण्यासाठी तयारी करण्याला वयाची मर्यादा नसते. जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, तर लहान वयातही मोठं स्वप्न बघायला अजिबात हरकत नाही.
चेअरमन सर: तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारी नोकर म्हटल की, लोकांच्या नजरेसमोर एका भ्रष्ट व्यक्तीचं चित्र उभं राहतं आणि समजा जर तुमची या सेवेसाठी निवड झाली, तर तुम्हीही त्याच भ्रष्ट मार्गावरून जाणार की त्याच्या विरूद्ध जाणार? मी: सर तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. आज जो तो पैशांच्या मागेच धावतोय. आणि अनेक सरकारी कर्मचारीही याला अपवाद नाही. आज लाखो रूपये जवळ असणाऱ्यांनाही करोडोंची अपेक्षा असते. पण ज्या व्यक्तीकडे आज दहा करोड आहेत, ती व्यक्ती तरी सुखी आहे का? हा खरा प्रश्न आहे. बहुतेकांना हेच कळत नाही की पैशांनी सुविधा विकत घेता येतात, पण सुख नाही. खरं सुख तर समाधानी असण्यातच आहे. पैसे कमविण्याचा अधिकार तर सर्वांनाच आहे. पण तो कमविताना जर त्याला नीतीची जोड असेल, तर त्या पैशांसोबतच समाधानही मिळतं. नाही तर अपमार्गाने मिळवलेले पैसे कायम आपल्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करत असतात. आणि सर, जर माझ्यापुरता विचार करायचा झाला, तर माझ्या गरजा खूप कमी आहेत. त्यामुळे मी पैशांपेक्षा आत्मिक समाधानाला अधिक महत्त्व देतो. चेअरमन सर: (प्रभावित होत व आपल्या खूर्चीत परत आरामात बसत.) मला सांगा, तुमच्या धुळे जिल्ह्यात सध्या कोणकोणत्या आरोग्यविषयक समस्या अधिक तीव्र आहेत? मी: एक मागासवर्गीय व अविकसित जिल्हा असल्याने धुळे जिल्ह्यात मलेरिया, क्षयरोग, डेंग्यू, डायरिया यांसारखे होणारे अनेक आजार मोठ्या प्रमाणात आढळतात. पण या सर्वांमध्ये आदिवासी समाजातील लहान मुलांना असलेली कुपोषणाची समस्या सर्वात अधिक तीव्र आहे, असं मला वाटतं.
चेअरमन सर: एक प्रशासक या नात्याने तुम्ही ही कुपोषणाची समस्या प्रभावीपणे कशी हाताळाल? मी: सर, आपल्या समाजात बहुतेकांना संतुलित आहाराविषयी विशेष माहिती नाही. याबाबतीत सर्वांना जागरूक करणे खूप महत्वाचे आहे. त्यांना तिथल्या स्थानिक अन्नघटकांपासूनच एक संपूर्ण आहार कसा मिळू शकतो याची माहिती पूरवल्यास कुपोषणाची समस्या बरीच आटोक्यात येऊ शकते. पण यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवणे आवश्यक आहे. बरोबर आहे. गहु, बाजरी यासारख्या स्थानिक…
चेअरमन सर: अन्नघटकांपासूनही संपूर्ण आहार मिळू शकतो. याबाबतीत समाजाला शिक्षित करणं फार महत्त्वाचं आहे. मी: होय सर आणि मला असंही वाटतं की, जी मुलं खूप जास्त कुपोषणग्रस्त आहेत, त्यांना अंगणवाडी व मध्यान्ह भोजन योजनांद्वारे पूरक अन्न उपलब्ध करून दिलं पाहिजे. (चेअरमन सर स्वत: हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर चे सचिव होते व पूर्वी ते सांस्कृतिक खात्याचे डायरेक्टरही राहिलेले होते. मला कोंडीत पकडण्यासाठी म्हणाले)
चेअरमन सर: खरं आहे. पण अंगणवाडीमधून काय दिलं जातं याची तुम्हाला माहिती आहे काय? मी: सर, मी लहान असताना आम्हाला साखर व मक्याच्या पावडरचे मिश्रण असलेली सुगडी खाण्यास दिली जात होती. चेअरमन सर: पण ती तर विशेष पौष्टिक नसायची. मी: होय सर, ते खरं आहे. पण आजकाल शासन मुलांना शाळांमधून खिचडी व दूधही पूरवत आहे. मला वाटतं की, त्या माध्यमातून मुलांना पोषक तत्त्व मिळत असावीत.
चेअरमन सर: धुळ्याच्या शैक्षणिक स्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? मी: एक आदिवासी जिल्हा म्हणून शैक्षणिक बाबतीत धुळे जिल्ह्याला चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. बहुतेक शाळांमधील शिक्षकांची संख्या व दर्जा वाढविण्याची गरज आहे. एकूणच शैक्षणिक बाबतीत धुळे जिल्हा अजूनही बराच मागे आहे. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-58
(त्यानंतर त्यांनी मला माझी आवड व छंद याबाबतही विचारलं. नंतर पुन्हा प्रश्नांचा रोख धुळ्याकडे वळवला) चेअरमन सर: धुळे जिल्ह्यात पोस्टिंग होणे म्हणजे एक शिक्षाच आहे, असं समजलं जातं. तुमचं याबाबत काय म्हणणं आहे? मी: सर, धुळे जिल्ह्याचा रहिवासी या नात्याने हे स्वीकारणे मला कठीण जातेय. पण प्रामाणिपणे सांगायचे झाल्यास तुम्ही म्हणताय ते कटू असले तरी सत्य आहे.
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
