दिनांक ९ ऑगस्ट,श्रीगोंदा:
आज श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी महाविकास आघाडी कडून एकही फॉर्म न आल्याने पाचपुतेंचे कट्टर समर्थक सौ. मनिषा शंकर कोठारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी जाहिर करताच भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून आनंद साजरा केला.

यावेळी बोलतांना आ. पाचपुते यांनी नवनिर्वाचित उपसभापतींचे अभिनंदन केले. तसेच, खासदार सुजयजी विखे पाटील यांचा या विजयात मोलाचा वाटा असून, बाळासाहेब नाहटा, युवा नेते साजन पाचपुते, लक्ष्मण आण्णा नलगे, रमेश तात्या गिरमकर व मा.सभापती पुरुषोत्तम भैया लगड या सर्वांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे विजयश्री खेचुन आणण्यात यश आले. असे गौरवउद्गार पाचपुते यांनी काढले.

यावेळी ज्ञानेश्वर विखे पाटील, बाळासाहेब महाडीक, संदिप नागवडे, पोपटराव खेतमाळीस, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, शहाजी भाऊ खेतमाळीस, अंबादास औटी, प्रविण कुरुमकर, नितीन नलगे, प्रतिभाताई गांधी तसेच, पंचायत समिती सदस्य- शहाजी हिरवे, जिजाबापू शिंदे, नाना ससाणे, सुरेश गोरे, रजनीताई देशमुख, आशाताई गोरे, प्रतिभाताई झिटे, दत्ताभाऊ कोठारे, राजेंद्र उकांडे, अमोल शेलार, रोहित गायकवाड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(संदीप नागवडे)


