दिनांक ७ ऑगस्ट, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत की काय ? असा प्रश्न आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्या ऐवजी ढिकले यांनी त्यांचा गुणगौरव झालेल्या जुन्या प्रतिमा आणि ट्रॉफीज भिंतीवर लावल्या आहेत.

काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ढिकले यांना नमूद प्रकार निदर्शनास आणून देऊनही, अशा प्रतिमा पोलीस स्टेशनला लावण्यात येत नसतात. त्या मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजे, तहसीलदार यांच्या दालनातच असतात.! असे उपस्थितांना ठणकावून सांगितले आहे.
असला कोणताही आदेश पोलिसांना नसतो. असेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे संभ्रमात पडलेल्या कार्यकर्त्यांना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे फुले – शाहू – आंबेडकरांसह राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्याविषयी उदासीन असल्याने ते जातीवादी वृत्तीचे अधिकारी तर नाहीत ना ? अशी चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आद्यदेशानुसार (Gr) महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या तसेच त्यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयात असणे बंधनकारक असल्याचे सर्वश्रुत आहे. शासनाच्या नियमानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये महापुरुषांची छायाचित्रे लावणे बंधनकारक आहे. कार्यालय प्रमुखाने शासकीय मुद्रणालयातून महापुरुषांची छायाचित्रे विकत घेऊन, त्याची फ्रेम करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे.
देशाची घटना आपणाला धर्मनिरपेक्षता सांगत असल्याने, निर्धारित केलेल्या महापुरुषांच्या फोटो व्यतिरिक्त इतर देवी-देवतांचे फोटो शासकीय कार्यालयात निषिद्ध आहेत.

तरीही पोलिस निरिक्षक रामराव ढिकले रोज सकाळी आल्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील दत्त देवापुढे वर्दीवर नतमस्तक होतात आणि त्यानंतरच कर्तव्यावर रुजू होतात. रोज होणारी दत्ताची पूजा आणि कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांचा विसर, यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली करणे पोलीस निरीक्षकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करीत आहे. Isn’t Shrigonda police station a government office? Is Inspector of Police Ramrao Dhikale bigger than great men?
लवकरच विविध सामाजिक संघटना व पदाधिकारी रामराव ढिकले (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा) यांना महापुरुषांच्या कार्याची जाणीव तसेच, महाराष्ट्र शासनाच्या आदेशाची आठवण करून देत, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्याविषयी आग्रह धरणार असून, लवकरच गृहमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.
स्त्रोत:(आंबेडकरी कार्यकर्त्यांची चर्चा)

