दिनांक ५ ऑगस्ट, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा या गावात दोन दिवशीय रेशनकार्ड दुरुस्ती करिता, शिबीर ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ढोरजा या गावी रेशनकार्ड / शिधापत्रिका वाटप करण्यासाठी २ दिवशींय शिबीर लावण्याची मागणी Ad. रमेश सदाशिव जठार, Ad. संदीप भोईटे, (सामाजिक कार्यकर्ते) प्रमोद जालिंदर उजगरे, भागवत चंद्रभान व्यवहारे, उत्तम रमेश पवार इत्यादिंनी केली आहे.

ढोरजा येथील अनेक लोंकाचे शिधापत्रिका दुबार व बदली करायचे आहेत. अश्यातच कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधामुळे अनेक लोंकाना तालुक्याच्या ठिकाणी येता येत नाही. Demand for two-day camp in Dhorja for ration card repair.

रेशनकार्ड नसल्यामुळे अनेक शासकीय कामं होत नाही. तसेच, शिधपत्रिका नसल्याकारणाने अनेक गरजू लोंकाना धान्य मिळत नाही. त्यामुळे ढोरजा येथे रेशनकार्ड दुरुस्ती, दुबार शिधापत्रिका व लोंकाना नवीन रेशनकार्ड मिळण्याच्या उद्देशाने २ दिवशींय शिबीराची मागणी Ad. रमेश सदाशिव जठार, Ad. संदीप भोईटे, (सामाजिक कार्यकर्ते) प्रमोद जालिंदर उजगरे, भागवत व्यवहारे, उत्तम पवार यांनी स्थानिक प्रशासनास निवेदन देऊन केली आहे.
स्रोत:(प्रमोद उजगरे यांचे प्रसिद्धीपत्र)

