देऊळगावात २०३ लोकांचे लसीकरण संपन्न..

दिनांक ६ मे(देऊळगाव, श्रीगोंदा):

तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. प्राथमिक शाळेत दिनांक ५ मे रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांचे मार्गदर्शनाखाली व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगणचे डॉ. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका यांच्या आयोजना मार्गत साधारण २०३ नागरिकांना कोव्हीशील्ड लस देण्यात आली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या लसीकरणाची सुरवात देऊळगावचे प्रथम नागरिक शरदराव गलांडे (सरपंच) यांचे पासुन झाली. सर्वांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन केले. (203 people vaccinated in Deulgaon..) या लसीकरण मोहिमेत विशेष योगदान प्रहार अपंग संघटना तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे, उपाध्यक्ष सुरेश गलांडे, डॉ. सुरावसे, संतोष कोठारे, पंडित गायकवाड, संदीप गवारे (मेजर), डॉ. घोडेकर, सौ. कवितके (सिस्टर), ग्रामसेवक शिंदे मॅडम यांचे योगदान लाभले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने सर्व नियमांचे पालन करीत हे लसीकरण पार पडले.

स्रोत:(सुरेश गलांडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading