दिनांक ३ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात सामाजिक ,राजकीय, प्रशासकीय यंत्रणा संभाळून समाजाच्या विविध कामांचा पाठपुरावा करण्यासाठी अनिल ठवाळ यांचे चिरंजीव श्रीकांत ठवाळ यांनी श्रीगोंदा जागृती नावाने साप्ताहिक चालू केले आहे.त्याचा शुभारंभ दिनांक २ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न झाला.

यावेळी श्रीगोंद्याचे (आमदार) बबनराव पाचपुते, (जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष) बाबासाहेब भोस, (सहकार महर्षी नागवडे सहकारी कारखान्याचे चेरमन) राजेंद्र नागवडे, हरिदास (आबा) शिर्के, (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव, (गट विकास अधिकारी) प्रशांत काळे, प्रा. तुकाराम दरेकर, जिजाबाप्पू शिंदे, (सभापती) देशमुख मॅडम, (उप सभापती) पाडळे मॅडम, (माजी सभापती) प्रतिभा ताई झिटे, (अप्पर तहसीलदार) चारुशीला पवार मॅडम, (पंचायत समितीच्या माजी सदस्य) अनुराधा ताई ठवाळ, गायकवाड ताई, (पत्रकार) शकील भाई शेख, राजमहमंद शेख, नितीन रोही, शेख युसुफ पटेल, रमेश गांधी, सुरज गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बाबासाहेब भोस हे अध्यक्ष होते.
यावेळी विचारमंकावरील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा जागृती वर्तमानपत्रास शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(अनिल ठवाळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार)
