पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धन कार्यात अग्रगण्य असणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते, लेखक ,पर्यावरण प्रेमी , आदर्श शिक्षक संतोष उषाबाई शामराव परदेशी यांची निवड करण्यात आली.त्यांच्यामुळे राज्यातील पर्यावरण चळवळीला आता अधिक वैचारिक धार प्राप्त होणार आहे.व्याख्यानाच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्याचा संदेश राज्यभर पोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संगोपनावर भर देणे गरजेचे आहे असे ते नेहमी आपल्या व्याख्यानातून सांगत असतात.पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.गावपण पुस्तकाच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी संदेश दिला आहे.यापूर्वी या संस्थेवर राज्य संघटक,राज्य कार्याध्यक्ष या पदाची जबाबदारी सांभाळली आहे.त्यांची २०२६ ते २०२९ कालावधीसाठी अहिल्यानगर येथे झालेल्या कोर कमिटी बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी राज्यअध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे,प्रमोद काकडे छायाताई राजपूत
, सुभाष वाखारे,मारुती कदम,नानासाहेब गोफणे,तुकाराम अडसूळ, डॉ.अनिल लोखंडे,निर्मला म्हस्के, ललिता पवार ,बाळासाहेब डोंगरे,चंद्रकांत भोजने,राजकुमार गिरी,इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.या निवडीबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थ व वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य रामदास चव्हाण व सहकारी अध्यापक यांनी व्याख्याते संतोष परदेशी यांचे अभिनंदन केले.
व्याख्याते संतोष परदेशी यांची राज्य कार्याध्यक्षपदी निवड














Leave a Reply