#पुणे: हुंड्यासाठी श्रीगोंद्यातील विवाहितेचा छळ; गर्भपाताची सक्ती करणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या..

दिनांक ३ जून २०२६, पुणे/श्रीगोंदा :

चारचाकी गाडी, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (रा. नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात पती गोरख संभाजी सोनवणे, सासरा संभाजी लक्ष्मण सोनवणे आणि सासू अलका संभाजी सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाह २५ जून २०२० रोजी झाला होता. पहिली मुलगी झाल्यानंतर पतीने कारसाठी २ लाख रुपयांची मागणी करत मारहाण केली. मुलीच्या डिलिव्हरीचा १ लाख रुपयांचा खर्चही माहेरच्यांनीच केला.

जून २०२४ मध्ये तेजस्विनी दुसऱ्यांदा गरोदर असताना, “मुलगा असेल तरच नांदवायला आणून सोडा,” असा अमानुष पवित्रा पतीने घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तिचा गर्भपात झाला.

एप्रिल २०२६ मध्ये फ्लॅटसाठी ३ लाख रुपयांची मागणी केली, तर मे २०२६ मध्ये अधिक मासाच्या जेवणावेळी सोन्याच्या अंगठीसाठी वाद घालून तिला मारहाण करण्यात आली.

२ जून २०२६ रोजी रात्री तेजस्विनीने चंदननगर येथील घरात गळफास घेतला. तिला मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चंदननगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading