दिनांक १३ डिसेंबर, श्रीगोंदा:
एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेसोबत दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २२ वर्षीय पूजा अतुल मोरे राहणार अरणगाव दुमाला असे त्या मृत महिलेचे नाव आहे. नमूद घटनेनंतर महिलेचा पती आणि सासरा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ननंद, सासरे, सासू हे पूजाचा सासरी छळ करत असे. सदरील त्रास पूजा तिच्या घरच्यांना फोनद्वारे व पतीला कळवत होती. चार चाकी गाडी घेण्यासाठी पूजाकडे पैशाची मागणी करण्यात येत होती.

याबाबत सविस्तर असे की, मागील वर्षी १९ डिसेंबर २० रोजी पूजाचे अतुलशी लग्न झाले. लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही. तोच..हा गंभीर प्रकार समोर आला आहे. पूजाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह राहत्या घरी फॅनला लटकलेला परिस्थितीत आढळून आला. अरणगाव दुमाला गावातील रहिवासी असलेल्या अतुल मोरे याच्याशी पूजाचा विवाह झाला होता. दोघेही एकाच गावातील होते. मात्र, गाडी घेण्यासाठी पूजाकडे माहेरून पैसे आणण्याचा सतत आग्रह केला गेला.
अशा पद्धतीने पूजाचा सासरी छळ सुरूच होता. अचानक ८ डिसेंबर २१ रोजी पूजाचा मृतदेह घरात आढळून आला. फॅनला गळफास घेऊन, पूजाने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पूजाचा भाऊ संदीप दिवटे आणि चुलता तिच्या घरी गेले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पंचनामा करत, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व दुसऱ्या दिवशी पूजावर माहेरच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. Less than a year has passed since the marriage.
पूजाच्या अंत्यविधीला तिच्या सासरचे लोक उपस्थित न राहिल्याने. घरच्यांचा या घटनेबाबत संशय बळावला, यानंतर त्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार पती, सासरे, सासू, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
