दिनांक १४ डिसेंबर, श्रीगोंदा:
भैय्यासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंबेडकरी चळवळीमध्ये दीपस्तंभासारखे आहे. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत चव्हाण(सर) यांनी केले. तालुक्यातील चिंभळे येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर आंबेडकरी विचारांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राजकारणाकडे ओढले गेले. पण सामाजिक व धार्मिक काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा वेळी भैय्यासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेची धुरा सांभाळली. महू (मद्यप्रदेश) ते चैत्यभूमी (मुंबई) अशी रॅली काढली. या रॅलीमध्ये भैय्यासाहेब यांनी स्वतः सायकल रिक्षा व रेल्वेच्या माध्यमातून प्रवास केला व समाजबांधवांनी जे पैसे दिले त्या सर्व पैशांच्या माध्यमातून चैत्यभूमीची निर्मिती केली.
चैत्यभूमी आपल्याला कोणामुळे जर पाहायला मिळत असेल तर, ते केवळ भैय्यासाहेबांमुळेच. असे अनेक कामे भैय्यासाहेबांनी केले आहेत. सर्व बौध्द बांधवांनी राजकारणा मागे न लागता समाज कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण सरांनी यावेळी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष आयु.राजू ओहोळ हे होते. Bhaiyasaheb Ambedkar’s work is like a beacon: – Prashant Chavan ..

यावेळी वेळी कार्यक्रमास बापु जाधव, बाळासाहेब जाधव, कमलेश जाधव, उत्तम उबाळे, बौद्धाचार्य भारत आल्हाट, सुरेंद्र जाधव, राहुल जाधव, वंचित बहुजन पत्राचे पत्रकार प्रदीप हिवाळे, रेवन घोडके, आनंद घोडके, रावसाहेब घोडके, सतीश ओहोळ (सर), दादा पंडित इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी आयु. गोरक्ष गायकवाड (भाऊसाहेब) यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ रामफळे यांनी केले व आभार मोहन जाधव यांनी यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
