दिनांक ८ ऑगस्ट २०२५,श्रीगोंदा: –
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही लोकचळवळ करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी केले. श्रीगोंदा प्राथमिक शिक्षक बँकेच्या हॉलमध्ये तालुकाध्यक्ष अनंता पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत मार्गदर्शक म्हणून बोलताना शाहूराव औटी म्हणाले की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महाराजांनी आम्हाला गनिमी कावा, शत्रूवर तुटून पडणे, योग्य वेळी तह करणे यांची नीती शिकवली. तीच नीती आपण स्वीकारली पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा आदर्श दिला आणि संविधानाद्वारे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार बहाल केले.

ते पुढे म्हणाले, या अधिकारांमध्ये लेखणीला विशेष महत्त्व आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही मुद्द्याची लढाई गुद्द्यावर न आणता लेखणीच्या माध्यमातून संयमाने सोडवावी. देशात कोणतीही तोडफोड न करता संयमाने न्याय मिळवून देणारी ग्राहक पंचायत ही एकमेव संस्था आहे. संयमाने कार्य केल्यास जिल्हा संघटना आपल्याबरोबर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पत्रकार पीटर रनसिंग, सतीष ओहोळ सर, मदन गडदे, ॲड. रमेश जठार, हरिभाऊ चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता पवार यांनी केले. सूत्रसंचालन जितेंद्र पितळे यांनी केले तर आभार संतोष भोसले यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise..

Whatsapp -> https://link.meesho.co/AtExyimiXw (+919405270560)
Catalog Name:*DENVER Imperial 165 Ml Combo Deodorant Spray – For Men (495 ml, Pack of 3) *
Type: Deodorant
Brand: Denver
Flavour: No Flavour
Net Quantity (N): 1
Dispatch: 2-2 Days
*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3
