दिनांक २९ मे २०२५, श्रीगोंदा/अहिल्यानगर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक न्यू टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अंतर्गत नगर तालुक्याच्या वतीने

अ.नगर जिल्हा शाखा, शहर शाखा व तालुका शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ भगवंत गायकवाड यांच्या हस्ते झाले.

शिबिरार्थींना भंते ए. सुमेधबोधि. केंद्रीय शिक्षक ए. जी. तायडे गुरुजी प्रशिक्षित करणार आहेत.

यावेळी संरक्षण उपाध्यक्ष संतोष गायकवाड, कायदेशीर सल्लागार राहुल कांबळे, संरक्षण सचिव गोरख केदारे, संरक्षण सचिव किशोर कांबळे व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी तसेच नगर शहराध्यक्ष दीपक पाटोळे, सरचिटणीस गौतम पाचरणे, कोषाध्यक्ष विजय चाबुकस्वार, उपाध्यक्ष लक्ष्मण माघाडे, सह सर्व शहर कार्यकारणी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करणे करिता नगर तालुका अध्यक्ष नितीन शिवाजी साळवे, सरचिटणीस अविनाश धोंडेबा राक्षे, कोषाध्यक्ष सुभाष भीमराव कांबळे, पर्यटन सचिव गौतम हंबर्डे,

कार्यालयीन सचिव सनी रखमाजी गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष विशाल पवार, संस्कार सचिव व पर्यटन विभागाचे अंकुश मोहन गायकवाड, समता सैनिक उपाध्यक्ष अमोल नाथा गायकवाड, समता सैनिक सचिव परमेश्वर भागिनाथ गायकवाड व सर्व कार्यकारिणी प्रयत्नशील आहेत.
शिबिरामध्ये एकूण २३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला आहे. त्यांना सर्व महापुरुषांचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, भगवान बुद्धांचे जीवन चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करणे व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट सफल करणे इत्यादी विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे. संयोजकांचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
स्रोत:(सतीश ओहोळ)
