छोटे ध्येय ठेवणे गुन्हा आहे: वाल्मीक निकाळजे यांचे प्रतिपादन..

दिनांक २६ जुलै २०२४, श्रीगोंदा:

“विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावेत, छोटे ध्येय ठेवणे गुन्हा आहे,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक तात्या निकाळजे यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वस्तीग्रह श्रीगोंदा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड होते.

वाल्मीक निकाळजे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक अडचणीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक संघर्ष केले आणि सर्वांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला. भारतीय संविधानाची निर्मितीही त्यांच्या संघर्षातून झाली. संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारांचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी उपयोग करावा. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नाना सांगळे, फरीद इनामदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले. तर, आभार सचिन घोडके यांनी मानले.

स्रोत:(सतीश ओहोळ सर)j

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading