“कोळाईदेवी विद्यालयाच्या मंजुश्री धीवर यांची ज्ञान प्रबोधिनीच्या प्रबोधन दूत म्हणून निवड”

दिनांक २५ जुलै २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

ज्ञान प्रबोधिनी संस्था,पुणे यांच्यामार्फत वाचन -लेखन चळवळ वृदद्धिंगत व्हावी या उद्देशाने प्रबोधन दूत ही योजना रयत शिक्षण संस्थेच्या श्री. कोळाईदेवी विद्यालय, कोळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील विद्यालयात सुरु झाली.
यासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे यांनी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका   मंजुश्री धिवर यांची प्रबोधन दूत म्हणून निवड केली. तसेच प्रबोधन दूत सहाय्यक म्हणून पल्लवी जाधव यांची निवड करण्यात आली.

वाचन – लेखनातुन सर्वांगीण विकास हा प्रमुख उद्देश या प्रकल्पाचा आहे. दर महिन्याला विविध लेखन – वाचन संबधी उपक्रम व स्पर्धा राबविन्यात येणार असून विद्यार्थ्यांना बक्षिसे ही वितरित करण्यात येणार आहे असे प्रबोधन दूत मंजुश्री धिवर यांनी सांगितले.

प्रबोधन दूत व सहाय्यक म्हणून ज्ञानप्रबोधिनी संस्थेमार्फत निवड झाल्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी मंजुश्री धिवर व पल्लवी जाधव यांचा सत्कार केला व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभारी पर्यवेक्षक ठोकळ, शिवरात्री, लोंढे, झिने, बोऱ्हाडे, लोमटे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading