आंदोलनाचा इशार देताच प्रकरण मार्गी..!

दिनांक १४ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील उक्कडगाव येथील दलित वस्ती साधारण ८ दिवसांपासून अंधारात होती. झालेली तांत्रिक अडचण दूर करण्याऐवजी स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे संतोष जौजांळ यांनी आंदोलनाचा इशारा देताच सदरील प्रकरण सुरळीत झाले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनच्या इशाऱ्याने लगेच डीपी दुरुस्ती करून वीज पुरवठा पुर्वरत करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे डीपी जळल्याने ८ दिवसांपेक्षा जास्त दलित वस्ती अंधारात होती. येथील वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी (तालुकाध्यक्ष) संतोष जौजांळ यांना फोन करून ही माहिती दिली. As soon as the warning of agitation was given, the officer became straight ..!

त्यांनी लगेच बेलवंडी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन वरून या विषय चर्चा केली. वीज पुरवठयाबाबत आलेली तांत्रिक अडचण तात्काळ दूर करा. अन्यथा, वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा दिला. अधिकाऱ्यांनी सदरील डीपी दुरुस्ती करतो असे सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी अडचण दूर करण्यात आली. या बद्दल वंचित बहुजन आघाडी शाखा उक्कडगावच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष जौजांळ यांचे अभिनंदन करण्यात आले.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply