श्रीगोंदा.. पिळवणूक करणे, पैसे खाणे, वसुली करणे, दारू पिऊन गोंधळ घालने, असे दुष्कृत्य अनेकदा या पोलिस दादाकडून घडलेत.!

दिनांक १५ डिसेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला एक पोलीस शिपाई हमेशा वादाच्या भूमिकेत समोर येत आहे. दारू पिऊन पत्रकारांना, सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांवर दमबाजी करणे त्याचे दैनंदिन झाले आहे. कार्यक्षेत्रात त्याची वादातीत कार्यकीर्द असून, अनेक ठिकाणी गावकाऱ्यांनी त्याच्या कार्यपद्धतीला कंटाळून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत, गावांतून हकालपट्टी (बदली) केलेली आहे. मात्र, सदर पोलीस कर्मचारी त्याचा गुण सोडायला तयार नाही.

काल दिनांक १४ डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये एका राजकीय पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्याला मागील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने नमूद पोलिसाने उचलून जाळीमध्ये बंद केले. या विषयाच्या वार्तांकनासाठी पत्रकारांनी फोटो काढले. परंतु, याचा पोलीस दादांना राग आला. त्यांचा पारा चढला अनं मंग, दादांनी सुरू केले नाटकं… त्या पत्रकाराला फोटो डिलीट करायला सांगा.. नाहीतर तुम्हांला जाळीतून थेट जेलमध्ये टाकून देईन..! असा दम दिला. या दादाला..! तपास अधिकारी (io) म्हणून, अधिकार असतांना, आरोपींना सोडायचे कि त्यांना जेलमध्ये टाकायचे.? याचा निर्णय पत्रकाराने काढलेल्या फोटो वर त्यांनी ठेवला. याचा अर्थ नमूद पोलीस कर्मचारी हा त्याच्या अधिकाराचा गैरवापर करतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोयं.

राज्य कार्यकारणी सदस्यास किरकोळ मुद्देमाल वसुलीसाठी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेऊन थेट त्यास जेलच्या जाळीमध्ये बसवण्यात आले. नमूद सामाजिक कार्यकर्त्याची या गोष्टीने अपप्रतिष्ठा झाली. म्हणून, पत्रकारांनी त्याठिकाणी त्या कार्यकर्त्याचा फोटो घेतला. त्याचा या पोलिस दादास भलताच राग आल्याने त्याने आकांडतांडव केले.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमांमध्ये पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या नाहीत.. म्हणून, आसपासच्या लोकांकडून खुर्च्या गोळा करून, ग्रामपंचायतील पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी देण्यात आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी त्या खुर्च्या ग्रामपंचायतीला कुलूप नसल्याकारणाने आणलेल्या ठिकाणी परत देण्यात आल्या. मात्र, विरोधात असलेल्या एका गटाने खुर्च्या चोरीला गेल्याबाबत सरपंचांना तक्रार देण्यास भाग पाडले. या खुर्च्यांचे राजकारण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले. चोरीचा गुन्हा दाखल झाला आणि मुद्देमाल हस्तगत होत नसल्याने चार खुर्च्यासाठी राज्य कार्यकारणी सदस्याला काल दादांनी ताब्यात घेतले.

प्लास्टिकच्या खुर्च्या हस्तगत करण्यासाठी सक्रिय झालेली पोलीस यंत्रणा अनेक मोठ्या प्रक्रियेमध्ये थंडीने गारठली असते. अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केली आहे. पोलीस कर्मचारीही राजकीय दबावतंत्राचा शिकार असल्याचे या प्रकरणातून समोर येत आहे. सदरील प्रकरण पोलिस निरीक्षक ढिकले यांच्या समोर मिटले असल्याची माहिती मिळाली. तसेच, ग्रामसेवक व BDO यांनी पोलिसांना खुलासा दिल्याचे समजते आहे. तरीही, वर्दीत नसतांना या पोलीस कर्मचाऱ्याने पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामागे निव्वळ राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.

सदरील पोलीस दादा अनेक प्रकरणांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. आढळगाव कार्यक्षेत्रात कार्यरत असतांना त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होऊन, तेथील कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना तक्रारी करत, त्याची बदली केली होती. लिंपणगावला असतानाही असाच गोंधळ..! तेथेही लोकं त्याच्या विरोधात उपोषणासाठी बसले होते. सर्वसामान्यांची पिळवणूक करणे, पैसे खाणे, वसुली करणे, दारू पिणे, गोंधळ घालने असे दुष्कृत्य अनेकदा या पोलिस दादाकडून घडले आहेत. एकदा एका सार्वत्रिक कार्यक्रमात दारू पिऊन, अनियंत्रित गाडी चालवल्याने त्यांचा अपघात होता.. होता बजावल्याचे अनेकांनी पाहिले आहे. नुकतेच एका राजकीय पदाधिकाऱ्याला त्याने धमकावले होते. त्यावेळी दादा मद्यधुंद होते.

त्यामुळे अशा पोलिस कर्मचाऱ्याला कार्यक्षेत्रातून बदला..! तसेच, त्याचे निलंबन करा.! अशी मागणी आता जोर धरत आहे. Shrigonda .. Extortion, money laundering, recovery, drinking and making a mess, such misdeeds have been committed many times by this police grandfather!

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply