मिरजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका; २५ लाखांच्या गांजासह दोघांना अटक..

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ अहिल्यानगर:

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मिरजगाव येथे मोठी कारवाई केली आहे. कर्जत ते पाथर्डी रोडवर सापळा रचून १३२ किलो गांजासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, एकूण २५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक मिरजगाव हद्दीत गस्त घालत असताना, एका स्कॉर्पिओ गाडीतून (MH-14 GH-2330) गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार मिरजगाव पोलीस ठाण्याचे सपोनि विजय झंजाड व एलसीबी पथकाने महात्मा फुले चौक येथील ब्रिजखाली सापळा लावला. संशयित गाडी थांबवून झडती घेतली असता, गाडीच्या डिक्कीत गांजा भरलेल्या ४ गोण्या मिळून आल्या.

१) गणेश अंकुश कराड (वय ३२, रा. आगसखांड, ता. पाथर्डी)
२) सुखदेव शिवनाथ कदम (वय ३०, रा. आगसखांड, ता. पाथर्डी)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: २५,४३,०००/- रुपये)

  • गांजा: १८,१८,०००/- रुपये किमतीचा (१३२.८४ किलो)
  • स्कॉर्पिओ गाडी: ७,००,०००/- रुपये
  • मोबाईल: २५,०००/- रुपये (दोन नग)

    याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(क) आणि २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरजगाव पोलीस करत आहेत.
  • सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डीवायएसपी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि समीर अभंग, भाऊसाहेब काळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply