श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणांची सोडत जाहीर; ५ गावांचे पूर्वीचे आरक्षण कायम..

दिनांक २५ जुलै २०२५, श्रीगोंदा:

जानेवारी २०२१ मध्ये आरक्षण निघूनही निवडणुका जाहीर आरक्षणानुसार न झालेल्या घारगाव, मांडवगण, महांडुळवाडी, कोकणगाव आणि भावडी या पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण जसाच्या तसा ठेवण्यात आले आहे. उर्वरित ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढून जाहीर करण्यात आले.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती: निंबवी, सारोळा सोमवंशी, देवदैठण, कोसेगव्हाण आणि भानगाव.

महिलेसाठी आरक्षित अनुसूचित जाती ग्रामपंचायती: एरंडोली, देऊळगाव, तांदळी दुमाला, हिंगणी दुमाला आणि घोटवी.

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ग्रामपंचायती: आनंदवाडी व घुगलवडगाव.

अनुसूचित जमातीतील महिलेसाठी आरक्षण: दाणेवाडी, बाबुर्डी आणि वांगदरी.

इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) व्यक्तींसाठी आरक्षण: वेळू, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा, म्हातारपिंपरी, घोगरगाव, खांडगाव आणि ढोरजे.

ओबीसी महिलेसाठी आरक्षित ग्रामपंचायती: चांडगाव, कौठा-शिपलकर वाडी, गव्हाणेवाडी, रायगव्हाण, कोरेगाव, कोथुळ, पिसोरेखांड, कोंडेगव्हाण, ढवळगाव आणि म्हसे.

सर्वसाधारण गटातील आरक्षित ग्रामपंचायती: आर्वी अनगरे, उक्कडगाव, उख्खलगाव, कोरेगव्हाण, घोडेगाव, चांभुर्डि, टाकळी लोणार, अजनुज, तरडगव्हाण, पारगाव सुद्रिक, बांगर्डे, बेलवंडी कोठार, मुंगूसगाव, राजापूर, रुइखेल, गार, विसापूर, शेडगाव, सुरोडी, हिरडगाव, येवती, सुरेगाव आणि चवर सांगवी.

सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण लाभलेली गावे: चोराचीवाडी, वडाळी, आढळगाव, पेडगाव, अधोरेवाडी, काष्टी, चिखलठाण वाडी, निमगाव खलु, सांगवी दुमाला, हंगेवाडी, बोरी, येळपणे, मढेवडगाव, अरणगाव दुमाला, बेलवंडी बु., माठ, कोळगाव, पिंपळगाव पिसा, घुटेवाडी, चिखली, बनपिंपरी, थिटे सांगवी आणि कामठी.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading