मढेवडगावचा शिवम पवार खांडव्यात(म. प्र.) सीबीएसई परीक्षेत अव्वल.

दिनांक १५ जुलै,मढेवडगाव/श्रीगोंदा:

शिवम अनंत पवार हा ९७.४० टक्के गुण मिळवून सी.बी.एस.ई. बोर्डाच्या इयत्ता दहावी परीक्षेत मध्यप्रदेश राज्या मधील खांडवा जिल्ह्यात सर्वप्रथम आला आहे.

मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील रहिवाशी असलेले आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खांडवा, मध्य प्रदेश येथील अधिष्ठाता (डीन) डॉ. अनंत पवार हे कोविड रुग्णांच्या सेवेत उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यांचा शिवम हा मुलगा आहे. तर, माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचा नातू आहे. त्याच्या या अलौकिक गुणवत्तेमुळे शिवमचे नगर व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

स्रोत व शब्दांकन:(विजय उंडे यांच्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading