शिवसेना व युवासेनेच्या वतीने श्रीगोंदयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

दिनांक १५ जुलै, श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, युवासेनाप्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेने व युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने श्रीगोंदयात दिनांक १३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन युवासेना (जिल्हाप्रमुख) रविभाऊ वाकळे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना वाकळे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी आव्हान केले कोरोनाच्या काळात राज्यातील नागरिकांना रक्ताचा तुतवडा भासत असल्याने जास्तीत जास्त रक्तदान शिबीर घेण्याचे शिवसैनिकांना आव्हान केलेले आहे. यासाठी शिवसैनिक सदैव तत्पर असून, असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा पडणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत, असे वाकळेनीं यावेळी बोलताना सांगितले आहे.

या कार्यक्रमात, (युवासेना उपजिल्हा प्रमुख) बाळासाहेब दुतारे, (तालुका प्रमुख) भाऊसाहेब गोरे, (शहरप्रमुख) संतोष खेतमाळीस, (युवासेना तालुका प्रमुख) हरीभाऊ काळे, (उपतालुका प्रमुख) संतोष शिंदे, नाथा पवार, ओंकार शिंदे, राहुल भालेकर, सागर खेडकर, मयुर गोरे, अक्षय सरोदे, सुशांत काळे, अनु पावसे, शिवाजी दांगडे दादा ढगे उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचे शिवसेना युवासेना यांनी आभार मानले आहेत.

स्रोत:(हरीभाऊ काळे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading