सिरो सर्वेसाठी श्रीगोंदा तालुक्यातून मढेवडगाव या एकमेव गावाची निवड.

दिनांक २६ ऑगस्ट(मढेवडगाव,श्रीगोंदा):

आय.सी.एम.आर. नवी दिल्लीच्या वतीने (कोविड-१९ सर्व्हे सॅम्पल कलेक्शन) सीरो सर्वेसाठी जिल्ह्यातील दहा गावांची निवड झाली आहे. प्रत्येक गावातून ६० लोकांचे रक्त नमुने व जिल्ह्यातील दहा गावांमधून सहाशे लोकांचे रक्त नमुने गोळा करण्यात येणार आहेत. या सर्व्हेसाठी श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या गावातून साठ लोकांचे रक्त नमुने घेण्यात येणार आहे. ही कार्यवाही जिल्ह्यात एकाचवेळी ३१ ऑगस्टला करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यातील मढेवडगाव ता. श्रीगोंदा, कोळगाव ता. अकोले, कासार दुमाला ता.संगमनेर, नांदूरखी ता.राहता, मडकी ता. नेवासा, शेवगाव शहर, कौडगाव ता. नगर, वासुंदे ता. पारनेर, संगमनेर शहर,नगर शहर या गावांमधून रक्ताचे नमुने गोळा करणार आहेत.

स्रोत:(पत्रकार विजय उंडे यांनी दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading