श्रीगोंद्यात होणार गॅस लाईन जंक्शन व्हॉल्व्ह..श्रीगोंदा ते औरंगाबाद गॅस पाईपलाईन चे काम लवकरच सुरू..

दिनांक २६ ऑगस्ट,श्रीगोंदा/औरंगाबाद:

गुजरात राज्यातील दहेज ते गोदावरी खोऱ्यातील विशाखापट्टणमपर्यंत नैसर्गिक गॅस पाईपलाईन जानार असल्याची माहिती मिळाली आहे. श्रीगोंद्यात गॅस लाईनचा जंक्शन व्हॉल्व्ह असणार आहे. पाईपलाईन अहमदनगर, वाळूजपासून औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणार आहे.

‘भारत पेट्रोलियम नैसर्गिक वायू रिसोर्स’ कंपनीला पाईपलाईन टाकण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे समजते आहे. साधारण १७५ किलोमीटर अंतरावरून २४ इंची स्टीलच्या पाईपद्वारे औरंगाबादेत गॅस उपलब्ध करण्यात येणार आहे. याबरोबर CNG इंधन पंप येत्या एक दोन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

वाळूज औद्योगिक वसाहत, शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीतील उद्योजकांसह शहर वाशियांना लवकरच घरगुती गॅस उपलब्ध होन्याची शक्यता आहे. नमूद कामासाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या पाईपलाईनचे औरंगाबाद पर्यंतचे काम पूर्ण होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

खा. डॉ. भागवत कराड आणि कंत्राटदार कंपनी भारत गॅस रिसोर्सेस प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद मांडके यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुभेदारी विश्रामगृह येथे याबाबत बैठक झाली. यात खा. कराड यांनी गॅस पाईपलाईनचे काम तातडीने सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बैठकीला इंडियन ऑइल कंपनीचे रूपेश राठोड, आर. बी. करंजगावकर, बीपीसीएलचे रूपेश रंजन, हिंदुस्तान ऑईल कंपनीचे व्यवस्थापक मांगीलाल, अमित पाठक उपस्थित होते.

यात नैसर्गिक वायूची गळती आणि स्फोट होण्याचा धोका कमी असतो. हवेत विरघळत असल्याने घरगुती वापरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या गॅसची किंमत इतर गॅस कंपन्यांपेक्षा कमी आहे. या प्रकल्पात १२५ ते २० मि.मी. व्यास जाडीच्या पाईपलाईन टाकणे, त्यासाठी घरापर्यंत गॅसपुरवठा करून मीटर रीडिंगनुसार बिल आकारण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार काम.

प्रत्यक्ष कामास नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. प्रशासकीय परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, NOC साठी डी.पी. असोसिएट कन्सल्टंट संस्था काम करत आहे.

स्रोत:(मिळालेली अधिकृत माहिती )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading