महामानव विचार प्रबोधन यात्रा: संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन..

श्रीगोंदा, दि. १५ फेब्रुवारी २०२५:

संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावित्री-फातिमा सद्भावना विचारमंच, अहिल्यानगर फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आणि सत्यशोधक महिला संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विचार प्रबोधन यात्रा आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. १६ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. संभाजीराव बोरुडे आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी या कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत. सामाजिक परिवर्तन, सद्भावना आणि समतेच्या विचारांना चालना देण्यासाठी या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील:

● रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५:
अध्यक्ष: अॅड. वैशाली डोळस (छत्रपती संभाजीनगर)
मुख्य वक्ते: आमदार लहू कानडे (श्रीरामपूर)
प्रमुख पाहुणे: अॅड. अरुण जाधव (जामखेड)

● सोमवार, दि. १७ फेब्रुवारी २०२५:
अध्यक्ष: अॅड. दीपाली लक्ष्मण बोरुडे
मुख्य वक्ते: संदीप थोरात (राष्ट्र निर्माण अभियान)
प्रमुख पाहुणे: प्रा. डॉ. मेहबूब सय्यद (अहिल्यानगर)

● मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२५:
अध्यक्ष: सौ. संगीता दगडू पावटे (अहिल्यानगर)
मुख्य वक्ते: सूर्यकांत भालेराव (बारामती)
प्रमुख पाहुणे: प्रा. डॉ. रफी सय्यद (पारनेर)

● बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२५:
अध्यक्ष: श्रीमती शोभा कांबळे (बारामती)
मुख्य वक्ते: आर एस यादव (परभणी)
प्रमुख पाहुणे: विजयराव चव्हाण (पत्रकार, दौंड)

कार्यक्रमाचे नियोजन सौ.अनुराधा ठवाळ, लक्ष्मी ताडे, सौ. अंजली माने, हिराबाई गोरखे, बापूशेठ माने आणि बापूराव औटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी मुकुंदराव सोनटक्के, अॅड. प्रदीप खामगळ, प्रशांत खामकर आणि अभिमन्यू सोनवणे सांभाळणार आहेत.

सदर प्रबोधन यात्रा आणि व्याख्यानमालेत फुले-आंबेडकर विचार मंच तसेच अॅड. संभाजीराव बोरूडे यांचे सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या विचार जागर यात्रेच्या माध्यमातून महामानवांचे विचार, सामाजिक समता आणि न्यायाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading