शासकीय सेवेत माणुसकी जपत वंचितांना न्याय द्या: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ..

दिनांक १५ फेब्रुवारी २०२५,अहिल्यानगर:

शासन सेवेत कायदे व नियमांचे पालन करताना माणुसकीची भावना जपावी आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन चिखले, सह सचिव विवेक बन्सी गायकवाड (मंत्रालय, नियोजन विभाग) आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासकीय सेवेत समर्पित भावनेने काम करण्याचे महत्त्व सांगितले. गायकवाड यांनी आपल्या यशात शिक्षक व मार्गदर्शकांचा मोठा वाटा असल्याचे सांगत जनकल्याणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अपयशातून शिकत यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश आघाव यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार डॉ. अमोल बागुल यांनी मानले.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading