भाजप आयटी सेल (सरल) च्या सह जिल्हा प्रमुख पदी श्रीगोंदयातील महेश क्षीरसागर यांची निवड..

दिनांक २६ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील श्री.महेश वनराज क्षिरसागर यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात असलेलं प्रभावी कामाची दखल घेऊन. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाचे कामे, ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी मोलाचा वाटा तसेच सडेतोड परखडपणे पक्षाची बाजू मांडली.पक्षप्रती असलेली निष्ठा या बळावर पक्षाने त्यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आय.टी.(सरल) च्यासह जिल्हाप्रमुख पदी वर्णी लागली..

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडियाचे शहराध्यक्ष श्री.महेश वनराज क्षिरसागर यांची जिल्हा सरचिटणीस मा. बाळासाहेब महाडिक (सरल जिल्हा प्रमुख)यांच्या सूचनेवरून तसेच श्रीगोंदा मतदार संघातील लोकप्रिय आमदार मा. बबनराव_पाचपुते (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री मा.रामशिंदे व मा.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते निवड करून, सत्कार करण्यात आला. समवेत जिल्हाध्यक्ष मा.अरूण मुंढे भानुदास बेरड आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

क्षीरसागर यांच्या निवडीबद्दल सहकारी, मित्र व पक्षातील कार्यकर्ते, नेते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्रोत:(महेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading