श्रीगोंदा तालुक्यामध्ये अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणा-याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपीकडून २८,८८,३३०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक ३० जून २०२६, श्रीगोंदा:

मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्याचे समुळ उच्चाटन करणे बाबत आदेश दिलेले आहेत.

वरील आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.

दिनांक २९/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा येथे इसम नामे अमोल जाधव याने प्रतिबंधित आणि शरिरास अपायकारक होईल असा गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्री करणे करीता खरेदी केलेला असुन तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानंतर पथकाने इसम नामे अमोल जाधव याचे राहते घराजवळ जावुन खात्री करता. तेथे तीन इसम पांढरे रंगाचे कारमधुन काही गोण्या स्विप्ट कारमध्ये भरतांना दिसले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन तीन इसम ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे १) अमोल रामदास जाधव, वय-३५ वर्षे रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, २) अनिल रतन कुरुमकर, वय- ४३ वर्षे, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, ३) फरहान रेहमान बेपारी वय- २३ वर्षे रा. बुरुडगल्ली, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसमांकडे सदरचा माल कोठुन आणला व कोणाचे सांगणेवरुन सदर मालाची विक्री करतो याबाबत विचारपुस करता अमोल जाधव याने कळविले की, सदरचा व्यवसाय हा मी व ४) दिपक लोखंडे रा. लोखंडेवाडी, ता. श्रीगोंदा (फरार) असे भागीदारी मध्ये चालवतो. व सदरचा माल जत जि. सांगली येथुन ५) अप्पु (पुर्ण नाव माहिती नाही) (फरार), ६) माजीद (पुर्ण नाव माहित नाही) (फरार) यांचेकडुन खरेदी केल्याचे सांगितले, तसेच फरहान रेहमान बेपारी यांनी सदरचा मला ७) शोयेब राजु तांबोळी रा. बुरुडगल्ली ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर (फरार) यांचे सांगणेवरुन विक्री करण्यासाठी घेवुन जात असलेबाबत कळविले,

आरोपीचे कब्जातुन ६,०३,२००/- रु किमतीचा आर.एम.डी, विमल पान मसाला/गुटखा व्ही-१ सुगंधी तंबाखु, २२,००,०००/-रु किमतीचे दोन चारचाकी वाहने त्यामध्ये अल्कायझर कार, स्विप्ट कार, ३०,१३०/-रु रोख रक्कम, ५५,०००/-रु कि.चे तीन मोबाईल, चार असा एकुण २८,८८, ३३०/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीविरुध्द पोकॉ/२५७४ मनोज मोहन साखरे नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. ६४९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२२३, २७४,२७५,३ (५), सह अन्न सरुक्षा मानके २००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading