श्रीगोंदा शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू.
टिळक भोस यांच्या प्रयत्नाला यश…!

दिनांक ३० जून २०२६, श्रीगोंदा:

गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीगोंदा तालुक्यात वाढलेल्या अवैध दारू विक्री, हातभट्टी व बेकायदेशीर धंद्यांविरोधात टिळक भोस, सतीश बोरुडे यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. यासाठी प्रशासनाला निवेदने देणे, आंदोलनाचा इशारा देणे तसेच संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती.

या पूर्वी अहिल्यानगर येथे आंदोलन व करण्यात आले होते तसेच १६ जून रोजी उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा देखील ईशारा भोस यांनी दिला होता.त्याची दखल घेत अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीगोंदा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील कारवाईला अधिक वेग मिळणार आहे.

यापूर्वी संबंधित कार्यालय अहिल्यानगर येथे कार्यरत असल्यामुळे स्थानिक पातळीवर तात्काळ कारवाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता श्रीगोंद्यातच विभागाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्टी व इतर बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया करत अनेक गुन्हे दाखल केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांमधील कारभार आता अधिक प्रभावीपणे नियंत्रित केला जाणार असून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांचे संपूर्ण समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी कठोर मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी टिळक भोस यांनी केली होती.

उत्पादन शुल्क विभाग हा महाराष्ट्र सरकारला २९ हजार कोटी पेक्षा जास्त महसूल जमा करून देणारा विभाग आहे. या विभागाने राज्यात २४ कार्यालय व नवीन आधीकारी कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहेत. मात्र राज्यात एकही कार्यालय सुरु करण्यात आले नाही.

मागील एक वर्षापासून पाठपुरावा करून आंदोलन उपोषण करून आम्ही हे कार्यालय सुरु करायला लावले आहे. मात्र हे भाड्याच्या जागेत सुरु करण्यात आले आहे. यासाठी सरकारी इमारत व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा सुरु ठेवणार आहोत. शिवाय अवैध धंदे गावठी दारू हातभट्टी पूर्णतः बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. टिळक भोस..जिल्हाध्यक्ष स्वराज्य जनजागृती परिषद.. अहिल्यानगर..

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading