🚨 श्रीगोंद्यात पोलिसांची मोठी कारवाई: ७६,७५० रुपयांची गावठी दारू नाश – दारू भट्ट्यांचा विध्वंस, ३.३० लाखांच्या वाहनांची जप्ती..

दिनांक २७ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या धाडीत ७६,७५० रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू, कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले असून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्ट्यांचा विध्वंस करण्यात आला आहे. तसेच या अवैध धंद्याकरिता वापरण्यात आलेली ३.३०लाख रुपये किमतीची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत..

ही कारवाई दि. २४ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत खालील आरोपींवर कारवाई करण्यात आली:

  1. रोहित मोहन घोडके, रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा
  2. स्वप्नील कैलास घोडके, रा. भीमवाडी, श्रीगोंदा
  3. प्रेम दीपक घोडके, रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा
  4. विनोद लंक्या काळे, रा. हिरडगाव फाटा, ता. श्रीगोंदा
  5. विजय विष्णु माने, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा
  6. गंगाधर मारुती फुलमाळी, रा. जोशीवस्ती, श्रीगोंदा कारखाना
  7. कार्तिक जिवा घोडके, रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा
  8. जनाबाई एकनाथ ससाणे, रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा

या आरोपींच्या ठिकाणी छापे मारून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन व तयार दारू जागीच नष्ट करण्यात आले, तसेच दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. वैभव कलुबमें, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, आणि मा. श्री. प्रविणचंद्र लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ दत्तात्रय शिरसाठ, पोहेको आप्पा तरटे, पोहेकाँ संभाजी वाबळे, पोना गहिनीनाथ यादव, पोकाँ विवेक दळवी, पोकाँ संदीप आजबे, पोकाँ अजिनाथ जाधव, पोकाँ सचिन वारे, पोकाँ गोरख जाधव, पोकाँ महादेव कोहक, मपोकाँ राणी व्यवहारे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्रोत:(प्रेस नोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading