मढेवडगावमध्ये तरुणांनी केले मास्कचे वाटप..

दिनांक ३ मे (मढेवडगाव,श्रीगोंदा):

सध्या कोरोना नावाच्या राक्षस रुपी रोगाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना,त्यास खबरदारीचा उपाय म्हणून,जे जे शक्य होईल.ते ते सर्व प्रयत्न आपापल्या परीने सर्वच थरातून केले जात आहे.

त्याचे उत्तम उदाहरण मढेवडगाव मधील महापुरुष जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. कानिफजी उगले यांच्या वाढदिवसानिमित्त व युवा उद्योजक संग्राम भैया शिंदे यांच्या प्रेरणेने प्रा. गोरख उंडे प्रा. योगेश मांडे , युवकांचे आशास्थान अभयजी गुंड , शिवभक्त अनिकेत मांडे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मांडे, ग्रामपंचायत सदस्य पती व समाजसेवक राहुल साळवे यांनी गावातील बचत गटातील अतिशय उत्तम दर्जाचे मास्क तयार केले असून,मढेवडगातील महिलांनी यातून एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या देखील हाताला काम व घरी बसून राहण्यापेक्षा उद्योग उभारून कुटुंबाला हातभार मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून,या तरुणांनी हे मास्क विकत घेऊन मोफत ग्रामस्थांना देण्याचे काम केले असून,या उपक्रमाचे सर्वच थरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading